वाशीम मध्ये सायंकाळी ०७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह…

पवन राठी
वाशिम – आज सायंकाळी जिल्ह्यातील ०७ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये रिसोड तालुक्यातील ०१,

वाशिम तालुक्यातील ०४ व कारंजा लाड तालुक्यातील ०२ व्यक्तींचा समावेश असून हे सर्वजण यापूर्वीच्या कोरोना बाधितांच्या संपर्कातील आहेत.

आसेगाव पेन (ता. रिसोड) येथील २९ वर्षीय महिला, तामसी (ता. वाशिम) येथील एकाच कुटुंबातील ३५ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगा व २ वर्षीय बलिकेला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.

या पाचही व्यक्ती आसेगाव पेन येथील कोरोना बाधित वृद्धेच्या संपर्कातील आहेत.

भीम नगर, कारंजा लाड येथील ५६ वर्षीय पुरुष व ४० वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. ते अकोला येथे मृत्यू पावलेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here