वर्ध्यात कार पुलावरून कोसळली…भाजपच्या आमदाराच्या मुलासह सात जणांचा मृत्यू…

फोटो - सांकेतिक

न्यूज डेस्क – वर्धा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिरोड्याचे भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांच्यासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वर्धा येथील भरधाव वेगात असलेली कार पुलाखाली कोसळली. या अपघातात कारमधील सर्व 7 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व विद्यार्थी असून वर्ध्याला जात होते.

या अपघातात कार तब्बल चाळीस फूट खोल नदीत पडली. कारमधील सातही जण अपघातात जागीच ठार झाले. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती, की कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागला. नदीच्या पुलावर असलेला संरक्षक कठडा तोडून कार थेट खाली कोसळली होती. यात कारचा चक्काचूर झाला होता. 

या अपघातात ठार झालेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची ओळख पटली असल्याचीही माहिती सावंगी मेडिकल कॉलेजच्या ओएसडींनी दिली आहे. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. आपला मुलगा भविष्यात डॉक्टर होणार आहे, असं स्वप्न सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिलं होतं. मात्र सोमवारच्या काळरात्री या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान या अपघातातील सातही विद्यार्थ्यांच्या मृत्यूनं संपूर्ण मेडिकल कॉलेजही हादरुन गेलं आहे.

मृतांमध्ये जिल्ह्यातीळ तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार याचा मृत्यू झाला असून इतर 6 जण विविध भागातून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आले होते. अपघातातील इतर सहा मृतांची नावं खालीलप्रमाणे –

नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएस
नितेश सिंग, 2015, इंटर्न एमबीएएस
विवेक नंदन 2018, एमबीएबीएस फायनल पार्ट1
प्रत्युश सिंग, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2
शुभम जयस्वाल, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2
पवन शक्ती, 2020एमबीबीएस फायनल पार्ट 1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here