एस.टी.आगारातील हमालांच्या सानिध्यात…चिखलीकर यांच्या खासदारकीची वर्षपूर्ती !

नांदेड
नांदेड लोकसभा निवडणूकीच्या ऐतिहासिक निकालाला एक वर्ष पूर्ण झाले. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिला कार्यक्रम एस.टी.महामंडळाच्या वर्धापनदिनाचा नांदेडच्या आगारात साजरा झाला होता. खा.चिखलीकर यांच्या खासदारकीचा एक वर्षाचा कार्यकाळ 23 मे रोजी पूर्ण झाला.

एस.टी.आगारातील हमालांना अन्न-धान्याचे किट वाटप करुन चिखलीकरांच्या खासदारकीची वर्षपूर्ती हमालांच्या सानिध्यात साजरी करण्यात आली.कोरोना महामारीच्या संकटामुळे लॉकडाऊनमध्ये सर्व जनता घरातच बंद होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलीता देण्यात आल्याने एस.टी.ची बस सेवा कालपासून सुरु झाली.

लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आलेल्या एस.टी.आगारातील हमालांना धान्याचे किट वाटप करुन खा.चिखलीकरांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न खासदारकीच्या वर्षपूर्तीनिमित्त करण्यात आला आहे.


कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या समाजातील गोरगरीब लोकांचे आपण काही देणे लागतो, याचे भान ठेवत आपल्या खासदारकीची वर्षपूर्ती नांदेडच्या बसस्थानकात हमालाच्या सानिध्यात साजरी केल्याने विरोधकांच्या भूवया उंचावल्या आहेत.


नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर खासदारकीची शपथ घेतल्यानंतर नांदेड येथे आल्यानंतर पहिल्याच दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी येथील अधिकारी व कर्मचार्‍यांसह आगारात काम करणार्‍यांना मी तुमच्या पाठिशी आहे, असे आश्वासन दिले होते.


वर्षपूर्तीपूर्वीच्या दोन महिन्यांपूर्वी देशासह राज्यात करोना विषाणूजन्य आजाराने थैमान घातल्यामुळे राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या टाळेबंदीचा फटका सर्वसामान्यांसह राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांसह तेथील कामगारांना बसला आहे. आपणही काही समाजाचे देणे लागतो,

या उदात्त हेतुने खा.चिखलीकरांनी जिल्ह्यातील वंचितांना धान्याचे कीट वाटप केले. भाजपाचे पदाधिकारी धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांच्यावतीने हामालांना मास्क व हँडग्लोजचेही वाटप करण्यात आले.


आपण शपथ घेतलेल्या दिवशी नांदेड बसस्थानकात कार्यरत असलेल्या कामगारांचे काही देणे लागतो, हे ध्यानात ठेऊन नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खासदारकीच्या वर्षपूर्ती बसस्थानकातील हमालांच्या सानीध्यात करण्याचा संकल्प केल्यामुळे शनिवार (दि.23) रोजी भाजपा पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत हमालांना धान्याच्या कीटचे वितरण केले.

यात हमाल, सफाईदार, स्वच्छक, सुरक्षा रक्षक अशा 70 लोकांना खासदार चिखलीकरांच्यावतीने त्यांचे सुपूत्र जि.प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, भाजपाचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या हस्ते धान्याच्या किटचे वितरण करण्यात आले.


या कार्यक्रमास नांदेड विभागाचे विभाग नियंत्रक अविनाश कचरे पाटील, संजय वाळवे, आगारप्रमुख पुरूषोत्तम व्यवहारे, नरसिंह निमनवाड, राजकुमार टिपराळे, लक्ष्मण देशमाने, दिनेश ठाकूर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, जि.प.सदस्य प्रवीण पा. चिखलीकर, सरचिटणीस विजय गंभीरे, अ‍ॅड.दिलीप ठाकूर, उपाध्यक्ष उभनलाल यादव, अशोक पा. धनेगावकर, व्यंकट मोकले, सूर्यकांत कदम, विशाल शुक्‍ला, ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे, संगीता झुंजारे, महादेवी मठपती यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

सुरक्षित अंतराचे भान ठेवत खा.चिखलीकरांनी वाटप केलेल्या धान्य कीटची बसस्थानक परिसरात चांगलीच चर्चा होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here