महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्या प्रकरणी पोलीस नाईक बडतर्फ…

सांगली – सन 2016 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेस बसण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाची परवानगी न घेता, एकाच नावाचे वेगवेगळे 15 ईमेल आयडी तयार करून, फॉर्म भरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्या प्रकरणी शिवानंद हणमंत बोबडे या पोलिस मुख्यालयातील पोलिस नाईकास बडतर्फ करण्यात आलंय.

पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी अर्ज प्रणालीवरून तीन ते चार गटात एकत्रितरीत्या एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा शुल्काचा भरणा केल्याचंही आढळून आलंय. तसंच सन 2016 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या दोन बैठक क्रमांकाचं पत्र शिवानंद हणमंत बोबडे यांनी घेतल्याचं निदर्शनास आलं होतं.

पोलीस खात्यासारख्या शिस्तीच्या खात्यात कार्यरत असताना, कायद्याचं भान ठेवून वागणं बंधनकारक असतानाही बोबडे यांनी अवास्तव फायद्याच्या हेतूनं गंभीर स्वरूपाचं गैरवर्तन केल्याचं दिसून आल्यानंतर विभागीय चौकशीमध्ये, चौकशी अधिकाऱ्यांनी दोषारोप शाबीत होत असल्याचा अहवाल दिल्यानं, शिवानंद बोबडे यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here