रामटेकमध्ये दिवसाढवळ्या सोन्या-चांदीच्या व्यापाराची बॅग अज्ञात चोराने केली लंपास…

रामटेक शहर प्रतिनिधी:-
रामटेक येथील गांधी चौकातील विमल ज्वेलर्सचे मालक, शाम बालचंद बादुले आज सकाळी 10:15 वाजता दुकान उघडायला गेले असता दुकानाचे कुलूप उघडताना त्यांनी बाजूला ठेवलेली सोन्याचांदीच्या दागिन्यांनी आणि सोन्याचे कव्हरिंग असलेले दागिन्यांनी भरलेली बॅग काही सेकंदातच त्यांना दिसेनाशी झाली. त्यांनी बाजूच्या नाश्ता दुकानदाराकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडून मला माहित नाही असे उत्तर मिळाले. अज्ञात चोराने त्यांची बॅग लंपास केल्याचा त्यांना संशय आला. बॅगमध्ये एकूण 4,75,662 रुपये किंमतीचा मुद्देमाल होता.

त्यांनी शांतिनाथ मार्ग, राखी तलाव मार्ग, तुमसर मार्ग, बस स्टँड मार्ग या चारही दिशांना आपल्या परीने अज्ञात चोराला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु चोराचा शोध लागला नाही. रामटेकचे पोलीस अधीक्षक, नयन आलुरकर यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन शहानिशा केली. शेवटी रामटेक पोलिस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध भा.द.वि. कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलीस अधीक्षक, नयन आलुरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, प्रमोद मकेश्वर,सहाय्यक पोलीस निरीक्षक, विवेक सोनवणे आणि पोलीस अंमलदार ,मनोहर राऊत, मनोज चाचेरे पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here