पुण्यात शिक्षकाने १२ वीच्या विद्यार्थिनीला केली शरीरसुखाची मागणी…पालकांनी शिक्षकाच्या तोंडाला काळं फासून काढली धिंड…

न्यूज डेस्क- राज्यात बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केलं जाईल असं सांगण्यात आलं. त्यासाठी विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या माध्यमातून गुण देण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली. मात्र, याचाच गैरफायदा पुण्यातील एका नामांकित शाळेच्या शिक्षकानं घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बारावीच्या परीक्षेत गुण वाढवून देतो, असं सांगून एका शिक्षकानं बारावीच्या एका विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचं समोर आलं आहे. विद्यार्थिनीच्या पालकांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी आज या विकृत शिक्षकाची तोंडाला काळं फासून धिंड काढली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यावरून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिजित पवार असे या शिक्षकाचे नाव आहे.

पुण्याच्या विश्रामबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत असणाऱ्या एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बारावीच्या परीक्षेत तुला गुण वाढवून देतो, असं सांगून अभिजित पवार हा सदर मुलीकडे शरीरसुखाची मागणी करत होता. तो वारंवार अशा प्रकारे मागणी करत असल्यामुळे त्रस्त होऊन विद्यार्थिनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. मात्र, नकार देऊन देखील प्रकार सुरूच राहिल्यामुळे अखेर सदर विद्यार्थिनीने शिक्षक अभिजित पवारने केलेला फोनकॉल रेकॉर्ड केला आणि आपल्या पालकांना, तसेच नातेवाईकांना ऐकवला.

यावर भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी संताप व्यक्त करीत राज्यातील आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here