जीवनाला दिशा मिळण्यासाठी विद्यार्थी हा नेहमी वाचक असला पाहिजे-मुख्याध्यापक बी एम बिरादार…

अहमदपूर – बालाजी तोरणे

भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन यानिमित्ताने यशवंत विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यात विद्यालयाचे मुख्याध्यापक बी एम बिरादार यांनी विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून वाचनाचे महत्त्व पटवून दिले. वाचाल तर वाचाल !

या म्हणीप्रमाणे विद्यार्थी हा नेहमी वाचक असावा. अभ्यासाव्यतिरिक्त अनेक पुस्तकांचे वाचन करावे. जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी नेहमी विद्यार्थ्यांनी अनेक पुस्तके वाचन केले पाहिजे.असे मत बी एम बिरादार व्यक्त केले.

कलाशिक्षक महादेव खळुरे यांनी विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ भांडार व्हाट्सअप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून चांगल्या लेखकाचे पुस्तके वाचण्यासाठी ई ग्रंथालय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. यामुळे विद्यार्थ्यांना आवडीचे अनेक पुस्तके मोबाइलद्वारे वाचण्याची संधी उपलब्ध झाली.

यातूनच वाचन प्रेरणा दिनाचे महत्व पटवून देण्यात आले.डाँ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या जीवन चरित्रावर अधारित विविध लेख वाचण्यासाठी वाटसअँपवर पाठवून देण्यात आले. थोर पुरुष,कादंबरी,आत्मचरित्र,पर्यटन,खेळ,गमतीजमती,जनरल नाँलेज,वैज्ञानिक आदि पुस्तके वाचायला ग्रुपमध्ये पाठवून देऊन हा आँनलाईन उपक्रमातून जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

वरील उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव दलितमित्र शिक्षणमहर्षी डी. बी.लोहारे गुरुजी,शाळेचे मुख्याध्यापक बी. एम. बिरादार,उप मुअ पुरुषोत्तम डांगे,पर्यवेक्षक उमाकांत नरडेले,रमाकांत कोंडलवाडे कलाशिक्षक सतीश बैकरे आदिनी अभिनंदन व कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here