नागपूर जिल्ह्यात ६,६०१ कोरोनामुक्त…४,९८७ नविन कोरोना बाधितांची रुग्णांची भर…७६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू…

शरद नागदेवे

नागपूर ‌- नागपूर जिल्ह्यात आज दि.३/५/२०२१ सोमवार रोजी २०,१७८ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली.यामध्ये ४,९८७ कोरोनाबाधित आढळले असून यात शहरातील ३,१६१ व ग्रामीण क्षेत्रातील १८१४ व बाहेरील १२ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ७६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील ४८, ग्रामीण क्षेत्रातील

१६ व बाहेरील १२ रूग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ६६०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शहरातील ४,५९६ व ग्रामीण क्षेत्रातील ‌२००५ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ७२,४३७ रूग्ण उपचाराधीन असून शहरातील ४१,३४१ व ग्रामीण क्षेत्रातील ३१,०९६ रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here