नागपुरात महिलेने एयर गन द्वारे शेजाऱ्यावर केला हल्ला…

शरद नागदेवे

नागपूर – कोराडी नाका,नायडू मंदिर जवळ दि.३/३/२०२१ बुधवारी रोजी रात्री ही सनसनाटी घटना घडली.एका महिलेनी शेजाऱ्यावर बंदुकनी फायर केले.यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.फायरिंगची सूचना मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.तपास केल्यास एअरगण असल्याची माहिती मिळाली

.उशीरा रात्रीपर्यंत पोलिस घटनेचा तपास करीत होती.पोलीसांनी फायर करणाऱी महिला.शिरीन रहमानला ताब्यात घेतले आहे.नायडू मंदीर जवळ शिरीन रहेमानचा प्लॉट आहे.तीचा प्लॉटचा बाजूला अब्दुल रज्जाक नावाचा व्यक्तीचा फ्लॉट आहे.

दोघेही खाली प्लॉटवर आपल्या मालकी हक्क दाखवित आहेत.या कारणांमुळे त्यांचा वादविवाद सूरू होता.बुधवारी रात्री ९:३० वाजता त्यांचा मध्ये परत वादविवाद झाला.शिरीन ने तीच्या घरी असलेल्या एअरगननी रज्जाक वर फायर केले.त्यामध्ये रज्जाक वाचला व एअरगन चा छर्रा रज्जाकचा कार च्या टायरला लागला.

रज्जाकनी फायर केल्याची माहिती पोलीस कंट्रोल रूममध्ये दिली.माहिती मीळताच डीसीपी निलोत्पल आणि कोराडी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहचले.पोलीसांनी शिरीनची एअरगन ताब्यात घेतली.शिरीण आपल्या सुरक्षेकरिता फायर केल्याचे सांगत आहे.पोलीसांन कडून विचारपूस सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here