प्रहारचा दणका गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी सुरु फटाका फोडो, अर्धनग्न आंदोलनाला यश…

गोंदिया – अमरदिप बडगे

तिरोडा तालुक्यात तहसिल कार्यालया समोर फटाका फोडो, अर्धनग्न आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष गोंदियाच्या वतीने करण्यात आले होते. शेतकरी प्रहार कार्यकर्ते यांनी कपडे उतरवून अर्धनग्न होऊन प्रशासना विरोधात धान खरेदी सुरु करण्याकरिता मागणी केली आंदोलकांची भूमिका पाहून प्रशासन जागे झाले व तात्काळ धान खरेदी सुरु करून आपल्या पणन कार्यालयाची चम्मू घेऊन आंदोलकांना मौका स्थळी भेट दिली.

आंदोलकांना लिखित स्वरूपात पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, त्यात गोंदिया जिल्ह्यात एकूण 105 धान खरेदी केंद्र आहेत त्यात आज 13 धान खरेदी केंद्र सुरू केले असून तिथे 12585.80 क्विंटल धान 411 शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आले असल्याचे पत्र देण्यात आले.

उर्वरित आधारभूत धान खरेदी केंद्र उद्या 26/11/2021 पासून जिथे-जिथे आवक सुरु आहे तिथे धान खरेदी करण्यात येईल असे लिखित पत्र जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून सहाय्यक जिल्हा मार्केटिंग अधिकारी बिसेन, कार्यालयाचे कर्मचारी हजारे, पोलीस प्रशासन,

तिरोडा तहसिलदार प्रशांत घोरुडे, यांच्या समोर दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व सविस्तर चर्चा करण्यात आली की धान खरेदी करतांना कोणतीही लूट होणार नाही, 40 किलो 580 ग्राम वजन काटा करून धान घेण्यात येईल असे जिल्हा मार्केटिंग प्रशासना कडून सांगण्यात आले.

आंदोलनात गोंदिया प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, प्रदीप निशाने तिरोडा तालुका अध्यक्ष, जिल्हा महेंद्र नंदागवळी, सुनिल गिरडकर आमगाव तालुका अध्यक्ष, तिलक पारधी, वामन हजारे, सुखराम पंधरे, देवानंद मेश्राम, राकेश उपासे, विशाल आदमने, विनोद बावनथडे, नंदकिशोर बोबडे, सतिश क्षिरसागर, अजय ढाले, राजकुमार शेंदरे, आर . टी. चुटे, बारकू मेंढे, जयराम शिवणकर, प्रल्हाद बाहेकार, टाईकराम ब्राम्हणकर,

शुभम सोनेवाने, राजेंद्र सोनेवाने, अर्जुन कलथार, शैलेष नरोले, रवी लिल्हारे, खुशाल शेंडे, रामू शरणागत, वसंत नागपुरे, अभिषेक शहारे, कोमल दमाहे, सुरेंद्र बिरनवार, धीरज बरियेकर, एस. जी. उईके, चंद्रकांत बडवाईक, सेवक ठाकरे, अंकुश कढव, अनिल , भोजराज उईके,

अध्यक्ष बिरसा मुंडा फाईटर, राकेशव जी. सोयाम विदर्भ महानिरीक्षक, प्रमेश परतेती, चंद्रशेखर भगत, लीलाधर परतेती, कुमारजी उईके, कृष्णा परतेती, मुन्ना सलामे, शालिक कुकडे, तुषार पटले, महेश कुकडे, विनोद कुकडे, अश्विन शेंडे, इत्यादी शेकडो च्या संख्येत आंदोलक प्रहार कार्यकर्ते, शेतकरी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here