गडचिरोली जिल्ह्यात एक महिला कोरोनामुक्त, तर दोन नवीन रुग्ण आढळले…

गडचिरोली

जिल्हयात धानोरा तालुक्यातील एक महिला कोरोनामुक्त झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात ५८ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. रात्री दोन नवीन रुग्ण यामध्ये, गडचिरोली व चामोर्शी येथील प्रत्येकी एक कोरोना बाधित आढळून आले आहेत.

त्यामूळे सक्रिय कोरोना बाधित संख्या १० झाली तर जिल्हयातील एकुण बाधित संख्या ६९ झाली. धानोरा तालुक्यातील एक महिला काल रात्री कोरोनामुक्त झाल्याने तीला दवाखान्यातून डीस्चार्ज देण्यात आला.तसेच रात्री संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेले दोन नवीन रुग्ण जिल्ह्याबाहेरून आलेले कोरोना बाधित आढळून आले.

यातील चामोर्शी येथील महिला(वय ३८ वर्ष) पतीसह मुंबई येथून ट्रकने जिल्हयात दाखल झाली होती. मुळचे ते चेंबर येथील रहिवासी आहेत. महिलेच्या पतीचा कोरोना अहवाल मात्र निगेटीव्ह आला आहे.

दुसरा रुग्ण गडचिरोली येथील ५१ वर्षीय पुरुष CRPF कर्मचारी असून कोलकता येथून नागपूर मार्गे जिल्हयात आला होता. नागपूर येथून २३ CRPF जवान आले होते. त्यातील काही निगेटीव्ह तर काही अहवाल येणे बाकी आहे. आलेल्या सर्व जवानांना विलगीकरणात ठेवलेले आहे.नव्याने आढळलेल्या दोन्ही रुग्णांना कोरोना लक्षणे नसून पुढिल उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here