चिन्मय खाजगी कोविड रुग्णालयाचा पुन्हा गंभीर प्रकार समोर,रुग्णालयाचा बायोमेडिकल वेस्ट कचरा रस्त्यावर…

विनायक पवार – पालघर

बोईसर चित्रालय येथील खाजगी चिन्मय कोवीड रुग्णालय मधील वैद्यकीय कचरा हा थेट बोईसर तारापुर रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

चिन्मय खाजगी कोवीड केअर सेंटरमधील पीपीई कीट व इतर कचरा रस्त्यावरील बोईसर ग्रामपंचयता च्या कुंडित टाकल्याचा गंभीर प्रकार घडला असून या सेंटर वर्ती कार्रवाई ची मागणी होत आहे.

वास्तविक केंद्रीय पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने २८ मार्च २०१६ रोजी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन अधिनियम लागू केला आहे. त्या कायद्यानुसार जैव वैद्यकीय कचऱ्याची सास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र कोरोना काळात बोईसर मध्ये त्याला खो बसत आहे. 

सदया कोरोना काळात आगोदरच नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड भीती पसरली असून त्यामध्ये अश्या स्वरूपाच्या गंभीर चुक कोविड खाजगी रुग्णालय करत आहे.

चिन्मय कोविड रुग्णालया कडून बोईसर चित्रालय रस्त्यावर कोरोणा रुग्णाच्या उपचार दरम्यान पी पी किट, सलाईन, सुया, रक्ताळलेले बँडैंज हे वापरलेल्या सर्व घातक वस्तु चिन्मय रुग्णालया कडून रस्त्यावर फेकन्यात आली आहे.

बोईसर येथील चिन्मय कोविड रुग्णालयातील”बायोमेडिकल वेस्ट कचरा उघड़यावर व कचराकुंडीत टाकला जात आसल्याने बोईसर ग्रामपंचायत कडून चिन्मय रुग्णालयांस नोटिस देऊन समन देण्यात आली आहे.

घातक असा “बायोमेडिकल वेस्ट’ कचऱ्याच्या संकलनासाठी स्वंतत्र वेस्टेज मॅनेजमेंट ची नियुक्त न करता राजरोस पने कचरा रस्ता वर फेकला जात आहे.

कोविड रुग्णालयातील बायो वेस्टेज कचऱ्याचे
रुग्णालयातूनच वर्गीकरण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी कोणता कचरा काळ्या, निळ्या, पिवळ्या, पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांत टाकावा, असे सूचित केलेले आहे. मात्र या रुग्णालयाकडून कोणत्याही प्रकारे “बायोमेडिकल वेस्ट’चे विलगीकरण केले जात नसून ते रस्त्यावर फेकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

बॉस
हे चिन्मय कोविड रुग्णालय कोरोणा रुग्णाच्या बिला मध्ये बायोमेडिकल वेस्टचा अतिरिक्त चार्ज आकारत असल्याचे कोरोना रुग्णाचे म्हणणे आहे.

कोट-
चिन्मय रुग्णालयाला ग्रामपंचायत बोईसर कडून पत्रव्यवहार करून वेस्टेज बायो कचऱ्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने विलेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत परत रस्त्यावर अश्या स्वरूपाचा कचरा टाकला तर संबंधित रुग्णालया वर्ती योग्य ती कारवाई करण्यात येईल.

कमलेश संखे
बोईसर ग्रामपंचायत ग्रामसेवक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here