भंडारा काँग्रेसमध्ये खांदेपालट…मोहन पंचभाई झाले नवे जिल्हाध्यक्ष

भंडारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील काही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष बदलविले. त्यात भंडारा जिल्ह्यातही खांदेपालट करण्यात आले. प्रेमसागर गणवीर यांना हटवून त्यांच्या जागी मोहन विठ्ठलराव पंचभाई यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.


मागील अनेक वर्षांपासून प्रेमसागर गणवीर यांनी भंडारा जिल्हा काँग्रेसची समर्थपणे जबाबदारी सांभाळली. राज्यात काँग्रेसची स्थिती पूर्ववत आणण्यासाठी पक्षाने संघटन बांधणीवर आता लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील नेतृत्व बदल करून पक्षवाढीवर भर दिला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील लातूर, औरंगाबाद, ठाणे, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर येथील विद्यमान जिल्हाध्यक्ष यांची उचलबांगडी करून नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे.


प्रेमसागर गणवीर यांच्या जागी आता मोहन पंचभाई यांची भंडारा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मोहन पंचभाई यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा प्रशासन ऍड गणेश पाटील यांनी केली. पंचभाई यांनी काँग्रेसच्या पवनी तालुकाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. ते पवनी पंचायत समितीचे उपसभापती राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here