अकोल्यात वाहन चालकांसाठी वाहतूक पोलिस आणखी कडक…वाहनाचे कागदपत्रे जवळ बाळगा…अन्यथा

अकोला शहरात वाढत असलेले मोटारसायकल चोरीचे गुन्हे व चेन स्नॅचिंग च्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने कागदपत्रे जवळ न बाळगता किंवा मोबाईल मध्ये DG लॉकर किंवा तत्सम अधिकृत अँप वर स्कॅन कॉपी न ठेवता वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांची वाहने वाहतूक कार्यालयात जमा करून ठेवण्याची मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे.

अशी वाहने कागदपत्रे पडताळून नंतरच दंडात्मक कारवाई करून सोडण्यात येत आहेत, ह्या मोहिमेचे फलित म्हणून आता पर्यंत 3 दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आणण्यात आल्या असून त्या पैकी 2 अकोला शहर व एक गाडगे नगर अमरावती येथील आहेत, आता पर्यंत एकूण 2900 दुचाकी वाहतूक कार्यालयात डेटेंड करण्यात आल्या होत्या त्या पैकी 4 मोटार सायकल अजूनही वाहतूक कार्यालयात असून वैध कागदपत्रे सादर न केल्यामुळे वाहतूक कार्यालयात डेटेंड केलेल्या आहेत, सदर वाहनांवर पूर्ण पडताळणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे।

मोटारसायकल चोरीवर आळा बसावा व चेन स्नॅचिंग च्या घटनांवर आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके,उपनिरीक्षक सुरेश वाघ व शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार ही मोहीम राबवित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here