अकोल्यात ११ अडत्यांना १ कोटी ८७ लाखाचा घातला गंडा…दोन आरोपी अटकेत…कृषी उत्पन्न बाजार समिती मधील प्रकार


अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तब्बल ११ अडत्यांना १ कोटी ८७ लाखाचा घातला गंडा घातल्याची तक्रार रामदास पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलीय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून शिवप्रकाश कालुराम रूहाटीया आणि लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनचा जावेद हुसेन कादरी यास अटक केली आहे.

अकोल्यातील रामदासपेठ पोलिस स्टेशनला 11 फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पणन विभागाच्या थेट परवानाधारक नर्मदा साल्वेस प्रा. ली. यांनी सोयाबीन खरेदीसाठी लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनचे शेख जावेद हुसेन कादरी यांना अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. नर्मदा साल्वेससाठी लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनने 11 अडत्यांकडून सोयाबीन खरेदी केली. जवळपास अडीच हजार पेक्षा जास्त क्विंटल सोयाबीन विकला आहे.

हा संपूर्ण व्यवहार 1 कोटी 87 लाख रुपयांचा आहे. परंतु, नर्मदा आणि लक्ष्मी फर्मकडून दोन महिने उलटूनही व्यवहाराचे पैसे देण्यात आले नाही. त्यामुळे अडत्यानी नर्मदा साल्वेसकडे व्यवहाराचे पैसे मागितले. परंतु, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. याबाबत अडत्यांनी शांततेत प्रकरण निपटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन्ही बाजूकडून नकारघंटा येत असल्याने अडत्यानी याबाबत रामदास पेठ पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी आरोपी विरोधात भादवि कलम 406, 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शिवप्रकाश कालुराम रूहाटीया आणि लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनचा जावेद हुसेन कादरी यास अटक केली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 11 अडत्यांचे एकूण 1 कोटी 87 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये
अजय भीमराव चिंचोलकर यांची 29 लाख 88 हजार 612, प्रशांत प्रल्हादराव देशमुख यांची 15 लाख 29 हजार 757 व 15 लाख 35 हजार 100 रुपये, भास्‍कर जगन्‍नाथ मानकर यांची 19 लाख 46 हजार 203, अतुल मोहनराव राठोड यांची 39 लाख 2 हजार 233, अनिल कांतीलाल जैन यांची 37 लाख 5 हजार 646, स्नेहल प्रकाश गांधी यांची 2 लाख 41 हजार 756 रुपये सतीश शांतीलाल जैन यांची 10 लाख 69 हजार 952 रुपये, अमर कमलकिशोर मालानी यांची नऊ लाख 50 हजार 530 रुपये, अजय रामकुमार अजमेरा यांची 1 लाख 61 हजार 992 रुपये, अरुण मधुकर सिंगरूप यांची 7 लाख 46 हजार 602 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here