महत्वाची बातमी | बारावी निकालाची मूल्यमापन पद्धत जाहीर…जाणून घ्या

फोटो - सौजन्य गुगल

न्यूज डेस्क – राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिता लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व संबंधीत घटकांशी चर्चा करून मुल्यमापन प्रक्रिया शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केली.

लेखीपरीक्षेसाठी निर्धारित एकूण गुणांपैकी ३०%गुण इ.१०वी परीक्षेत सर्वाधिक गुणप्राप्त ३ विषयांची सरासरी,इ.११वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय ३०%गुण,इ.१२वी वर्षातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्रपरीक्षा,सराव परीक्षा-चाचण्या,तत्सम मूल्यमापनातील विषयनिहाय ४०%गुण अवलंबून असतील.

विद्यार्थ्यांचे एकूण मूल्यांकन लेखी आणि अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापनाआधारे ठरवले जाईल. अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापन विहित कार्यपद्धतीनुसार केलं जाईल. यात प्रत्यक्ष प्राप्त गुण अंतिम निकालात समाविष्ट केले जातील.

राज्यमंडळाच्या इ.१२वी परीक्षा रद्द केल्यानंतर सर्व घटकाशी चर्चा करून विद्यार्थ्यांची मूल्यमापन व गुणदान कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.यंदा १२वी परीक्षेस प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर अंतर्गत मूल्यांकनाआधारे उत्तीर्ण करण्यासाठी राज्यशासनाने मंजुरी दिलीय.

शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता 10वी आणि इयत्ता 11वी या दोन्ही इयत्तांसाठी संपादणूकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करुन वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील विविध भागातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये या स्थानिक परिस्थितीमुळे एकाचवेळी सुरू होऊ शकल्या नाहीत.

तसेच राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांत 12वी च्या मूल्यमापन प्रकियेतील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यापैकी सर्वच परीक्षा घेण्यात आल्या आहेत असे नाही. त्यामुळे 12वी परीक्षा सन 2021 साठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना लेखी, तोंडी / प्रत्यक्षिक / अंतर्गत मूल्यपापन यासाठी निर्धारित केलेले गुण कायम ठेवण्यात यावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here