कोविडशी लढण्यासाठी RBI चा पुढाकार…गव्हर्नर दास यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा…जाणून घ्या

न्यूज डेस्क – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी जाहीर केले की, रेपो दरात 50,000 कोटी रुपयांची ऑन टॅप लिक्विडिटीची विंडो 31 मार्च 2020 पर्यंत खुली राहील. या योजनेंतर्गत लसी कंपन्या, वैद्यकीय सुविधा, रुग्णालये व रूग्णांना बॅंक लिक्विडिटी प्रदान करू शकतात. यापूर्वी ते म्हणाले की कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेचा प्रसार लक्षात घेता विस्तृत आणि महत्वाचे पावले उचलणे आवश्यक आहे.

शक्तीकांत दास म्हणाले की कोविड – 19 शी संबंधित विकसनशील परिस्थितीवर रिझर्व्ह बँक लक्ष ठेवेल. ते म्हणाले की, मध्यवर्ती बँक दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित देशातील नागरिक, व्यापारी घटक आणि संस्थांसाठी शक्य तितक्या पावले उचलेल.

१) लसींसाठी आणि रुग्णालयातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी बँक अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देणार. हे कर्ज कोविड लोन बुक प्रमाणे दिलं जाणार आहे. ही सुविधा पुढील वर्षांपर्यंत राहणार आहे.

२) आरोग्य सुविधांसाठी रिझर्व्ह बँकेनं ५० हजार कोटी रुपये निधीची घोषणा केली. यासाठी रेपो दराने बँकांना हा निधी पुढील तीन वर्षांसाठी उपलब्ध होईल. या विशेष खिडकीची सुविधा ३१ मार्च २०२२ पर्यंत सुरु राहणार असल्याचे दास यांनी स्पष्ट केले.

३) रिझर्व्ह बँक खुल्या बाजारातून ३५ हजार कोटींचे सरकारी रोखे खरेदी करणार. २० मे रोजी G-SAP 1.0 अंर्तगत रोखे खरेदी केली जाणार आहे.

४) करोनाच्या दुसऱ्या लाटेनं राज्यांना आर्थिक आघाडीवर जबर धक्का बसला आहे. अशा राज्य सरकारांना रिझर्व्ह बँकेनं आज मोठा दिलासा दिला. राज्यांची ओव्हरड्राफ्टची सुविधा ३६ दिवसांऐवजी ५० दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत या सुविधेचा लाभ राज्य सरकारांना घेता येणार आहे, अशी माहिती दास यांनी दिली.

५) सुक्ष्म व लघु व्यावसायिकांसाठी रिझर्व्ह बँक कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा एका वेळेसाठी कर्ज पुनर्रचनेचा (one-time restructuring) पर्याय खुला केला असून, वैयक्तिक कर्जदार आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना याचा लाभ घेता येणार आहे.

६) नागरिकांना बँकिंग व्यवहार करताना समस्यांना सामोरं जाऊ लागू नये, यासाठी रिझर्व्ह बँकेनं विविध श्रेणीत व्हिडीओद्वारे केवायसी प्रक्रिया तयार केली आहे. यामुळे लोकांना व्यवहार करणं शक्य होणारं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here