गत शासनाचे शासन निर्णय लागू करा…विरोधी पक्षनेते फडणविस यांची मागणी…पूरग्रस्त इटान गावाला दिली भेट…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

गत शासन काळात प.महाराष्ट्रात पुरपरिस्थिती निर्माण झाली असतांना तत्कालीन शासनाने पुरपरिस्थीतीवर मात करण्यासाठी एकुण सहा शासन निर्णय घेतले होते.तिच पुरपरिस्थीती पुर्व विदर्भातील भंडारा,गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यात असल्याने या परिस्थितीवर मात करण्यासाठी गत शासनाचे शासन निर्णय लागू करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी केली.

ते 3सप्टें.रोजीलाखांदूर तालुक्यातील पूरग्रस्त इटान गावाला भेटी दरम्यान बोलत होते. गत शासन काळात पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना तत्कालीन शासनाने पूरग्रस्त भागातील पूर्णतः कर्ज माफ केले होते. खरडून निघालेल्या शेतात पिकांची हानी म्हणून 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली होती.

पूर्णतः घर पडलेल्या कुटुंबांना अडीच लक्ष रुपयाची घर बांधकामासाठी मदत करण्यात आली तर अंशतः घरांचे नुकसान झालेल्यांना पन्नास हजाराची मदत देताना तातडीची मदत म्हणून रोख दहा हजार व अन्नधान्य पुरविण्यात आले होते.

हे संबंध निर्णय गत शासन काळात घेण्यात आल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीवर तत्कालीन शासनाला मात करता आली होती. सध्या पूर्व विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यात पीक परिस्थिती असल्याने गत शासन काळाच्या धर्तीवर राज्य शासनाने संबंधित शासन निर्णय लागू करावे असे देखील म्हटले.

येत्या अधिवेशनात या भागातील वीज बिलाचा प्रश्न शेतीचा व कृषी वीज पंपाचा प्रश्न यासह पूर परिस्थितीच्या संबंधाने राज्य शासनाला जाब करून शासन मदत देण्यास बाध्य करणार असल्याचे देखील सांगितले.

यावेळी खासदार सुनील मेंढे, विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके, माजी आमदार बाळा काशीवार, भाजपा तालुकाध्यक्ष विनोद ठाकरे, भाजयुमो अध्यक्ष योगेंद्र ब्राह्मणकर, नगरसेवक नरेश खरकाटे, वसंत एन्चिलवार, वामन बेदरे, प्रल्हाद देशमुख हरीश बगमारे, नूतन कांबळे ,शिवाजी देशकर, सुनील भोवते, उपसरपंच गिरीश भागडकर यासह तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here