मुर्तिजापूर | लसीकरण केंद्रावर राडा करुन सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणातील आरोपींना जामीन…

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणातील आरोपी सागर व प्रेम दुबे या आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन वर सोडले…

मूर्तिजापूर येथील नगरपरिषदेच्या आवारामध्ये लसीकरण केंद्रावर कोविड (कोरोनाव्हायरस) प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असताना प्रेम दुबे नामक व्यक्तीने त्याचा भाऊ दिनेश दुबे तसेच मुलगा सागर दुबे यांचे समवेत उपस्थित डॉक्टर व लसीकरण केंद्र वाले कर्मचाऱ्यांना धमकावून मारहाण करून शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण केल्याची घटना दी. ३१ मे २०२१ रोजी घडली होती.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय दंड विधान चे कलम ३५३, ३३२,५०४, ५०६, सह कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.आरोपी यांना अटक झाल्यानंतर आरोपी सागर दुबे व प्रेम दुबे यांनी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथील न्यायालयात जमानत मिळण्याकरिता त्यांचे वकील ॲड. सचिन वानखडे यांचे मार्फत जमानत अर्ज दाखल केला.

त्यानंतर सदर अर्जावर न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे काय आहे त्याबद्दल पोलिसांचा अहवाल मागितला सदर से अहवालामध्ये पोलिसांनी जमानत अर्जास तीव्र आक्षेप घेऊन सांगितले की यातील नमूद फिर्यादी हे निवासी वैद्यकीय अधिकारी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथे दिनांक ३१/०५/२०२१ रोजी स्टाफ सह महाराष्ट्र राज्य शासनाचे निर्देशानुसार नगरपालिका मूर्तिजापूर येथे कोविड लसीकरण शिबिर राबवित असताना नमूद वेळी यातील आरोपी नामे सागर प्रेमचंद दुबे,

प्रेमचंद जगनारायण दुबे यांनी व्हॅक्सिनेशन ऑफिसर डॉ. हेमंत तायडे यांना मागच्या लोकांना पहिले व्हॅक्सिनेशन करत आहे या कारणावरून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली की मै तुझे देख लुंगा, जिंदा जमीन मे गाड दुंगा अशी धमकी दिली व सदर गुन्ह्यातील फरार आरोपी नामे दिनेश दुबे यांनी हेमंत तायडे यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

पुढे पोलिसांनी न्यायालयात असेही कथन केले की सध्या कोरोना महामारी च्या महाभयंकर साथीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असून आरोपीतांचे कृत्यामुळे मूर्तीजापूर शहरातील कोव्हिड व्हॅक्सिनेशन दिनांक ३१/०५/२०२१ ते ०१/०६/२०२१ रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत बंद करण्यात आले होते त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण मुर्तीजापुर शहरातील व आजूबाजूचे नागरिकांवर पडला असून नागरिकांचे मनामध्ये आरोपीं विषयी रोष निर्माण झाला आहे.

त्याच प्रमाणे पोलिसांनी न्यायालयात असेही कथन केले की सदर गुन्ह्यातील आरोपी हे खुनशी प्रवृत्तीचे व आक्रमक असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांचेवर यापूर्वीसुद्धा सरकारी कर्तव्यात अडथळा या सदराखाली गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्यातील साक्षीदार हे वैद्यकीय व नगरपालिका अधिकारी-कर्मचारी असून आरोपिंचा जामीन झाला तर ते साक्षीदारांवर त्यांचे राजकीय वजन वापरून तसेच एखादे गुन्हेगारी कृत्य करून दबाव निर्माण करण्याची दाट शक्यता आहे त्याचा विपरीत परिणाम सदर गुन्ह्याचे तपासावर होण्याची दाट शक्यता आहे करिता आरोपींना जामीन देण्यात येऊ नये.

पोलिसांनी न्यायालयात असेही कथन केले की आरोपी यांचे या कृत्यामुळे कोरोणा योद्धा म्हणून ओळखले जाणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे मानसिक खच्चीकरण झाले असून त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. यातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता आरोपींना जर जामीन मंजूर झाला तर ते अशाच प्रकारचे कृत्य पुन्हा करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही पोलिसांचे म्हणणे असेही होते की सदर गुन्ह्यातील आरोपी नामे दिनेश दुबे हा गुन्हा घडला त्यावेळेस पासून फरार आहे.

ह्या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर झाल्यास ते आरोपी दिनेश दुबे याला फरार राहण्यास मदत करण्याची दाट शक्यता आहे व नमूद आरोपी यांचा जामीन झाला तर त्यांचेवर कायद्याचा वचक सुध्दा राहणार नाही करिता त्यांचा जामीन खारीज होण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयात केली. त्याच बरोबर आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्या संबंधित क्राईम रजिस्टर उतारे सुद्धा पोलिसांनी त्यांच्या अहवाला सोबत जोडले.

सदर अर्जावर आज सुनावणी होऊन सरकारी पक्षाने वरील कारणास्तव आरोपींचा जामीन खारीज करण्याची विनंती न्यायालयास केली तर आरोपींचे वकील यांनी न्यायालयात सांगितले की आरोपी सागर व प्रेम दुबे ह्यास सदर केसमध्ये खोटे फसविण्यात आले आहे. आरोपीचे वकील यांनी न्यायालयात सांगितले की वास्तविकता अशी आहे की दोन्ही आरोपी लसीकरण केंद्रावर लस घेण्याकरिता गेले असताना तेथील वैद्यकीय अधिकारी हे जाणून बुजून मागील येणाऱ्या त्यांच्या मर्जीतील लोकांचे नंबर लस घेण्याकरीता पुढे लावत होते.

त्यांच्या या गैरकृत्या विरुद्ध आरोपींनी आवाज उठविल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वतःच गैरकृत्य करुन उलटपक्षी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून आरोपी यांनाच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविले. त्याचप्रमाणे आरोपी यांच्याकडून काही हस्तगत करणे नसल्याने आरोपी यांची पुढील कस्टडी जरुरी नसल्याने आरोपी यांना जामिनावर तात्काळ सोडण्यात यावे अशी विनंती सुद्धा आरोपींचे वकील यांनी न्यायालयास केली.

त्याच प्रमाणे आरोपीचे वकील यांनी आरोपी यांच्या जमानती करीता सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या काही न्याय निर्देशावर सुद्धा भिस्त ठेवून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालयात वाचून दाखविला व त्याच प्रमाणे आरोपीचे जमानती संबंधित इतर महत्त्वाच्या बाबींकडे सुद्धा आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

आरोपीचे वकील व सरकारी पक्ष यांनी केलेल्या युक्तिवादास ग्राह्य धरून योग्य विचाराअंती अकोला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सागर दुबे व प्रेम दुबे यांचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here