एकाच घरातील ६ व्यक्तींना विषबाधा, तातडीने उपचाराकरिता केले दखल पुरण पोळी खाणे भोवले…

अतुल दंढारे – नरखेड वार्ताहर

नरखेड येथून जवळ असलेल्या परसोडी राऊत येथील पाहुण्यां सह एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींना विष बाधा झाली 1 वाजताच्या सुमारास घरातील पाहुणपणा करिता आलेल्या चिमुकल्या पाहुण्यांसह सहा जणांना सकाळी 10.वाजताच्या सुमारास पूरण पोळी खाली त्या नंतर एकाच घरातील 6 जणांना आलेल्या व पोट दुःखी जाणवू लागली हि बाब उपसरपंच अशोक राऊत यांनी माजी उपसभापती वैभव दळवी यांना सांगितली वैभव दळवी यांनी तातडीने 108 व वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधून घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती गांभीर्य ओळखून विषबाधा झालेल्या ना लगेच ग्रामीण रुग्णालय येथे आणुन भरती करण्यात आले भरती ना तातडीने उपाययोजना करण्यात आले.

विषबाधा झालेल्या मध्ये गंगाधर दुर्वे यांच्या कुटुंबातील त्याचा मुलगा अंकुश गंगाधर दुर्वे वय 30,सुन सीमा अंकुश दुर्वे वय 26 ,बाळ भाविका अंकुश दुर्वे वय 3 वर्ष, अलकेश अंकुश दुर्वे वय 11,सहीने मुलीकडे पाहुणे म्हणून आलेले नातु वेदाश बबलु उईके वय 11 वर्ष, सुमीत बबलु उईके वय 5 वर्ष यांचा संबंधीत आहे त्याच्या वर ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्वांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने मेडिकल नागपूर येथे पाठविण्यात आले

विष बाधा त्यांच्या आंब्याच्या रसामुळे झाली कि पुरण पोळी मुळें

दि.28/06/2021 रोजी सायंकाळी गंगाधराव यांच्या घरी पाहुण्यांना रसाच्या पाहूनचार होता त्याच बरोबर आज सकाळी त्यांना शिजवून ठेवलेले पुरणाचा पोळ्या सुध्दा खाण्यात आल्या रात्री उरलेल्या रस सकाळी खाल्ल्यामुळे वरील सर्वांना उलटी ,तोंडांत फेस व पोट दुःखी जाणवू लागली होती व त्यांची तब्येत खालावत गेली त्यामुळे नेमकी विषबाधा कश्यामुळे झाली हे कळु शकले नाही.

विष बांधा झालेल्या सर्वांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी यासाठी माजी उपसभापती वैभव दळवी स्वतः ग्रामीण रुग्णालय नरखेड येथे उपस्थित होते .प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना लगेच 108 व वसंतराव देशमुख प्रतिष्ठान च्या अंबुलन्सनी नागपूरला पाठविण्यात आले येथे सलील दादा देशमुख यांच्या सोबत संपर्क करुन साधुन योग्य उपचार मिळावा यासाठी प्रयत्नात आहे.

भरतीसाठी आलेल्या रुग्णाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता रुग्णालय अधिक्षक डॉक्टर वनकळस , डॉक्टर धांडे तसेच आरोग्य विभागाचे संपूर्ण कर्मचाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले .यावेळी उपस्थित रुग्णांच्या मदतीसाठी विवेक बालपांडे . मझर पठाण धावुन आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here