उगवन नझालेल्या सोयाबीनचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या: माजी मंत्री विनायकराव पाटील…

बालाजी तोरणे – अहमदपूर

बाजार पेठेतून विविध क़ंपण्याचे सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी करून पेरणी केली पेरणी करुन एक आठवडा होऊन गेला तरीसुद्धा सोयाबीनची उगवण झालीच नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

अशा उगवण न झालेल्या सरसकट अहमदपुर व चाकुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन दुबार पेरणी साठी शेतकऱ्यांना बियाणे व खते मोफत देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टी च्या वतीने माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्या कडे नुकतीच केली आहे.

भारतीय जनता पार्टी च्या वतीने‌ माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाद्वारे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून त्यामध्ये सोयाबीन उगवण न झालेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी,मागेल त्या शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यात यावे, सरसकट कर्ज माफी करावी,हरीण ,राणडुकर या वण्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केले आहे त्याचेही पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, शिल्लक राहीलेल्या हरभरा व कापूस खरेदी करून शेतकऱ्यांना त्याची रक्कम विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशा विविध शेतकऱ्यांच्या रास्त मागण्याचे निवेदन देण्यात आले असून.

वरील मागण्याच्या गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांना त्वरीत न्याय देण्यात यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी च्या वतीने अहमदपुर व चाकुर तालुक्यात तिव्र आंदोलन छेडण्याचा लेखी इशारा एका निवेदनाद्वारे माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी दिला आहे. सदरील निवेदनावर माजी मंत्री विनायकराव पाटील , माजी सभापती अॅड.आर.डी.शेळके, भाजपचे तालुकाध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे ,अॅड.अमित रेड्डी, शिवराज पाटील, देवानंद मुळे, राजकुमार खंदाडे, गोविंदराव गिरी, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेश ढाकणे,इतिराज केंद्रे, चंद्रशेखर डांगे, धनराज गुट्टे, डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी,राहूल शिवपुजे, श्रीकांत भुतडा, निखिल कासनाळे, निळकंठ पाटील, महेश बिलापटे , चंद्रजित पाटील, चंदकांत गंगथडे, सुभाष सोनकांबळे, प्रशांत जाभाडे,गफार पठाण,राम देवकाते, देविदास सुरणर, संजय मुसळे, गजानन मुंडे, रामानंद मुंडे, गोपीनाथ जायभाये,हाणमंत बडगिरे,संगम कुमदळे, विठ्ठल पाटील, गजेंद्र वलसे, गणपत फुलमंटे, भारत फुलमंटे, राम कानवटे,ज्ञानोबा जाएभाऐ,नागनाथ गायकवाड,विष्णु पौळ, वैभव बलुरे यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षरी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here