चंद्रपुर :- सावली, तालुक्यातील अंतरगाव, सावली तालुक्याला सिंचनासाठी वरदान असलेल्या वैनगंगा नदी ही अवैध वाळू माफियांसाठी वरदान ठरत असल्याचे चित्र सद्या अंतरगाव, निमगाव, निफांद्रा ,बोरमाळा या परिसरात दिसत आहे. सद्या घाटांच्या लिलावाची प्रकिया हि थंड अवस्थेत आहे. तसेच अनेक वर्षापासून या परिसरातील घाट हे लिलावात नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी सोबत सेटिंग आहे.
असे बोलून या भागातील ट्रॅक्टर हे दिवसाढवळ्या राजरोज पणे अवैध वाळूची उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे दिसत आहे. काही दिवसापूर्वी पावसामुळे काही दिवस हे घाट बंद होते मात्र आता या घाटातून रस्ता तयार करून अवैध वाळूचे वाहतूक सुरू आहे . दिवसाढवळ्या सुरू असलेल्या हा वाळूचा अवैध वाहतुकीकडे प्रशासन मात्र जाणीपूर्वक डोळेझाक करीत असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे शासनाचा लाखो करोडो रुपयाचा महसूल बुडत आहे तरी प्रशासनाने जागे होऊन या अवैध वाळू माफियांवर कारवाई करावी अशी या परिसरातील नागरिक बोलले जात आहे.