दर्यापूर | चिंचोली रहिमापुर येथे अवैध रेती चोरी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई…

दोन आरोपी ताब्यात : १० लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त

दर्यापूर (किरण होले)
आज सोमवार रोजी सकाळी पोस्टे रहिमापूर हदद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी पेट्रोलिंग करीत असता, गुप्त माहीतीदारा कडून खबर मिळाली की, आरोपी ,१.मंगेश श्रीकृष्ण प्रजापती वय 30 रा विहिगाव,२.शेख अय्युब शेख युसूफ वय 30 रा विहिगाव हे आरोपी विहिगाव येथुन अवैध रेती चोरी वाहतुक करीत आहे.

त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने नाकाबंदी करून दोन ट्रॅक्टर सह आरोपींना ताब्यात घेतले असून , आरोपीच्या ताब्यातून दोन ट्रैक्टर व ट्रॉली कि. 10 लाख 3 ब्रास रेती 12,500 रुपये असा एकूण 10 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 2 आरोपीसह पुढील कार्यवाही करीता पो स्टे रहिमापूर यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही मा पोलीस अधीक्षक श्री हरी बालाजी एन. मा अपर पोलीस अधीक्षक श्री श्याम घुगे साहेब याचे मार्गदर्शनात पो.नि. श्री तपन कोल्हे सा. यांचे नेतृत्वात पो.उप.नि. आशिष चौधरी Asi संतोष मुंदाने Npc पुरुषोत्तम यादव,रविन्द्र बावने, Pc दिनेश कनोजिया पंकज फाटे चालक प्रमोद सरोदे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here