मुर्तिजापुरात साडेपाच लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा केला जप्त…अकोला विशेष पथकाची कारवाई…

मुर्तिजापुर रेल्वे स्टेशन परिसरात गुटखा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्याच्या दुकानाजवळच अवैध रित्या प्रतिबंधित तंबाखू जन्य पदार्थ गुटखा वाहतूक करणारे चारचाकी वाहन टाटा ACS क्र MH 27 BX 3203 हे गुटखाने भरलेले अकोला पोलिस आधिक्षक श्री जी श्रीधर सर यांच्या विशेष पथकाने जप्त केले.

सदर वाहनाचा चालक विशाल राजेश घोरसले वय 21 रा रेल्वे स्टेशन मूर्तिजापुर यास ताब्यात घेतलेले असून त्यांचे चारचकी वाहनाची झड़ती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंदीत तंबाखू गुटखाने भरलेला माल ज्यात वाह तंबाखू 12 मोठे पोते कीमत 3,88,800 रुपये 2, तंबाखू पान बहार मोठे 04 पोते कीमत 225000 रुपये व

टाटा चारचाकी वाहनाची कीमत 450000 रुपये असा एकूण 10,63,800 रूपयांचा प्रतिबंधित गुटक्याचा माल विशेष पथकानी जप्त करून पो स्टे मूर्तिजापुर शहर येथे कार्यवाही करण्यात येत आहे.

जप्त करण्यात आलेला गुटखा कुठून आणला व कुठे देणार होता याचा तपास सुरू आहे.ही माहिती विशेष पथकाचे पथक प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी आमच्या प्रतिनिधी नरेंद्र खवले यांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here