सांगली जिल्ह्यातील रस्ते खड्डे मुक्त न केल्यास जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना काळे फासणार – प्रशांत सदामते यांचा इशारा…

सांगली – ज्योती मोरे

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था पाहता ते रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रविकास सेनेच्या वतीनं, युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली.

या मागण्यांकडं, जिल्हा परिषद प्रशासनानं लक्ष घालून नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू. असा इशारा प्रशांत सदामते यांनी दिलाय.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष ऐश्वर्या कोळी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सारिका जमदाडे, जिल्हा सचिव शशिकांत दुधाळ, उपाध्यक्ष महेश महाजन, रिक्षा वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश चेंडके, सांगली जिल्हा उपाध्यक्ष महेश साठे, महिला आघाडी उपाध्यक्ष रोहिणी पोतदार, शिरोळ तालुका अध्यक्षा अनिता माने, उपाध्यक्ष संदीप देवकते आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here