३० सप्टेंबर पर्यंत शाळा,कॉलेज बंद असतील तर अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्यायच्या कशा ?…उदय सामंत

फाईल -फोटो

न्यूज डेस्क – केंद्र सरकराने १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अनलॉक-४ साठी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये शाळा, कॉलेजेस, शैक्षणिक आणि कोचिंग संस्था बंदच राहतील. असे नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे.यावर राज्याचे उच्चशिक्षणतंत्र मंत्री यांनी आज ट्वीट करीत केंद्र सरकारला सवाल केला आहे.

“केंद्र सरकार म्हणते ३० तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लॉकडाऊन मुळे बंद…यूजीसी म्हणतेय ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या…राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय..३० सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा.” अश्या प्रकारे ट्वीट करून केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे.

तर उद्या पासून लागणाऱ्या अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकाने जारी केलेल्या गाईडलाईन प्रमाणे शाळा, कॉलेजेस, शैक्षणिक आणि कोचिंग संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहतील. ऑनलाइन आणि डिस्टन्स शिक्षणाला परवानगी देण्यात आली आहे.तसंच राज्य आणि केंद्र शासित प्रदेश ऑनलाइन शिक्षण आणि टेलि काउंन्सिलिंगशी संबंधित कामांकरता ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळामध्ये बोलवता येईल.

आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात झूमच्या माध्यमातून १३ अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरू सोबत ऑनलाईन बैठक संपन्न झाली. सामंत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षेसंदर्भातील निर्णयानुसार राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा एका समान पद्धतीने घेता येतील याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

विद्यार्थी हित लक्षात घेऊन एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन विद्यापीठानी एका समान पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील याचे नियोजन करावे तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेणे शक्य आहे का? याबद्दलही विचार करावा अशा सूचना सामंत यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here