पत्रकारांवर वेळेवर उपचार होत नसतील तर तात्काळ संपर्क साधावा…

अहमदपूर व चाकूर – बालाजी तोरणे

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांचे पत्रकारांना आवाहन !

मुंबई महाराष्ट्रातील संपादक व पत्रकारांवर रूग्णालयात वेळेवर उपचार होत नसतील, बेड, ऑक्सिजन,ऑम्बुलन्स मिळत नसेल तर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यानी 9270559092 / 7499177411 या मो न वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

यापूर्वी महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना रूग्णालयात राखीव बेडची व्यवस्था करून पत्रकारांवर योग्य व वेळेवर उपचार झाले पाहिजेत असे मुख्यमंत्र्यांना संघाचे वतीने मागणी केलेली आहे. कोरोनाच्या काळात पत्रकारांवर योग्य उपचार होणेसाठी शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

पुणेचे पत्रकार पांडूरंग रायकर, लातूरचे पत्रकार गंगाधर सोमवंशी, बीडचे पत्रकार भोसले, माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांना बातमी संकलन करीत असतांना कोरोना विषाणूची बाधा झाली आणि आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे त्यांना जीव गमवावा लागला.

भविष्यात असा प्रकार कोणत्याही पत्रकारासोबत घडू नये म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेने महाराष्ट्रातील संपादक व पत्रकारांची सुरक्षा मोहीम हाती घेतली आहे.

पत्रकार कोविड योद्धा म्हणून कोरोना काळात घराघरात बातमी पोहचविण्याचे महत्वाचे कार्य करीत असून महाराष्ट्रातील संपादक व पत्रकारांना आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध होत नसतील तर वरील मो.न वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here