तलावात गणपती मूर्तीचे विसर्जन केल्यास गुन्हे दाखल करू; पोलिस आयुक्तांचा इशारा…

औरंगाबाद – विजय हिवराळे

कोरोनामुळे यंदा गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यावर बंदी आहे. त्यामुळे विसर्जनासाठी कुठल्याही तलावाकडे जाता येणार नाही, तलावात गणेश मूर्ती विसर्जन केल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला आहे.

शहरातील हर्सूल तलावासह सातारा, नक्षत्रवाडी, पडेगाव, वाळूज परिसरातील तलावाकडे जाणारे सर्व मार्ग मंगळवारी बंद केले जाणार आहेत. त्यामुळे तलावाकडे कोणीही जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे

दरम्‍यान, महानगरपालिकेने गणेश मूर्तींचे संकलन व विसर्जन करण्याचीची जबाबदारी घेतली असून शहरातील विविध 23 ठिकाणी गणेशमूर्तींचे संकलन करण्यासाठी निवडले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here