औरंगाबाद मध्ये आता ऑटो चालक विना-मास्क आढळून आल्यास त्याची रिक्षा होणार जप्त ?…

औरंगाबाद शहरात आता ऑटो चालक विना-मास्क आढळून आल्यास त्याची रिक्षा जप्त करण्याचा मोठा आणि महत्वपुर्ण निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

शहरात एकूण 30 हजारांहून अधिक ऑटो चालक आहेत त्यापैकी बहुतांश जण हे विना मास्क गाडी चालवताना आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.

महापालिकेकडून वारंवार सांगण्यात येऊनही नियमाचे काटेकोर पालन होताना दिसून येत नाही.

कठोर पाऊले उचलल्याशिवाय आपल्या देशात नियमांचं पालन होत नाही हे ही शाश्वत सत्य आहे त्यामुळे, पोलिसांच्या या भूमिकेबद्दल सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी कठोर निर्णय घेणं ही काळाची गरज असल्याचं औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी बोलून दाखवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here