ही राजकारणाची नव्हे तर शेतक-यांच्या अस्मिता व अस्तित्वाची लढाई – मनोहर राऊत…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

वैनगंगा व चुलबंद नदीला आलेल्या पुराने तालुक्यातील बारमाही शेती नष्ट झाली आहे.या अस्मानी संकटात सर्वपक्षीय नेत्यांकडून शेतक-यांप्रती मिळणारा दिलासा अभिनंदनीय आहे.

मात्र या संकटात दिलासा देतांना कोणीही बाका निर्माण करण्याची गरज नसुन ही राजकारणाची नव्हे तर शेतक-यांच्या अस्मिता व अस्तित्वाची लढाई असल्याचे प्रांजळ मत माजी जि.प.सदस्य मनोहर राऊत यांनी व्यक्त केले.ते तालुक्यात पुरामुळे उद्धभवलेल्या पुरपरिस्थीती सबंधाने बोलत होते.

ते पुढे म्हणाले,तालुक्यात अतिवृष्टी झाली नसतांना देखील वैनगंगा व चूलबंद नदीला पूर येवून तालुक्यातील नदीकाठावरील व लगतची बारमाही शेती नष्ट झाली आहे.पुरामुळे हजारो हेक्टर पिक शेती नष्ट होतानाच अनेक कुटूंब बेघर झाली आहेत.अनेक कुटुंबांच्या अन्नधान्याची नासाड़ी झाली आहे.

यासबंध घटनेची माहिती जनतेला व नेत्याना देखिल आहे.या परिस्थितीत आपादग्रस्तांना नुकसान भरपाई व शासन मदतीची मागणी होणे देखील स्वाभाविक आहे.मात्र या संकटावर मात करण्याचे बळ शेतकरी व बेघर कुटुंबांना देतांना कोणी बाका निर्माण न करता समर्पक वृत्तीने आपदग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

दरम्यान जिल्ह्यात सुदैवाने राज्यात व केंद्रात सत्ताधारी दोन भिन्न सत्तेतील प्रमुख लोकप्रतिनिधी असल्याने आपसुकच शेतकरी व बेघर कुटुंबांच्या संकटावर मात करतांना प्रत्येकी संयुक्त वाटा उचलला जाईल असा आशावाद व्यक्त करुन ही राजकारणाची नव्हे तर शेतक-यांच्या अस्मिता व अस्तित्वाची लढाई असल्याचे आवर्जुन सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here