IBPS | प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू…जाणून घ्या

फोटो- सौजन्य गुगल

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ मॅनेजमेंट ट्रेनरच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते ibps.in वर जावून माहिती घेवून देऊन अर्ज करू शकता.

IBPS ने या भरती प्रक्रियेद्वारे 4,135 रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव दिला आहे. 19 ऑक्टोबर रोजी प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ मॅनेजमेंट ट्रेनर (CRP PO/ MT-XI 2022-23 च्या रिक्त पदांसाठी) या भरती प्रक्रियेची अधिसूचना जारी करण्यात आली. आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईटवर ibps.in वर अधिसूचना पाहता येईल.

पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना नीट वाचावी. अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी बंद होईल. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे.

उमेदवारांना ऑनलाईन प्राथमिक परीक्षा आणि ऑनलाइन मुख्य परीक्षा त्यानंतर मुलाखत उत्तीर्ण करावी लागेल.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.

IBPS PO परीक्षा: येथे परीक्षेची तात्पुरती तारीख जाणून घ्या

ऑनलाईन प्राथमिक परीक्षा: 4 आणि 11 डिसेंबर, 2021
प्राथमिक परीक्षेचा निकाल: डिसेंबर 2021/जानेवारी 2022
ऑनलाईन मुख्य परीक्षा: जानेवारी 2022
ऑनलाईन मुख्य परीक्षेचा निकाल: जानेवारी/फेब्रुवारी 2022
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची मुलाखत: फेब्रुवारी/मार्च 2022
निवडलेल्या उमेदवारांना प्रोविजनल अलॉटमेंट: एप्रिल 2022 पर्यंत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here