मी देखिल कार्यकर्ता म्हणून काम करीन; माजी मंत्री वीरकुमार पाटील…

राहुल मेस्त्री

मी देखील सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीन असे प्रतिपादन राज्याचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांनी कोगनोळी काँग्रेस प्रणित ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुढे ते म्हणाले आमचे मार्गदर्शक प्राध्यापक सुभाष जोशी सर जिथे आहेत तिथे मी आहे.

आणि मारुती कोळेकर देखील असतील. अनेक जण म्हणत होते की मी किंवा पाटील कुटुंब संपलेल्या आहे. पण कोगनोळी,हणबरवाडी,दत्तवाडी येथील जनतेच्या आशीर्वादामुळेच आज स्टेजवरती उभा आहे. कोण किती टीका करते याकडे लक्ष न देता एकजुटीने काम करूया असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील बोलताना म्हणाले कोगनोळी सारख्या मोठ्या गावातील ग्रामपंचायतीचा गड राखणे म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहे. येणाऱ्या काळात येथील जनतेला शासनाच्या सर्व योजना पंकज पाटील पोहोचवतील असा मला विश्वास आहे.

तर माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी म्हणाले कोगनोळीची निवडणूक ही ऐतिहासिक झाली होती. येणाऱ्या काळातील तालुका पंचायत ,जिल्हा पंचायत आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी एकजुटीने काम केल्यास यश नक्कीच भेटेल असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोगनोळी येथील काँग्रेस प्रणित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला .प्रारंभी स्वागत ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत यांनी केले. तर प्रास्ताविक मारुती कोळेकर यांनी केले .याप्रसंगी चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे सर,

माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांच्यासह सर्व नुतन ग्रामपंचायत सदस्य आणि कोगनोळी ,हणबरवाडी ,दत्तवाडी येथील विविध संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here