महिलेचे आंघोळ करतांना काढत होता फोटो…लोकांनी रंगेहात पकडले…पुण्यातील शासकीय गेस्ट हाउसमधील प्रकार…

फोटो- सांकेतिक (फाईल)

न्यूज डेस्क – पुण्यातील आयबीच्या शासकीय निवासस्थानात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवास्थानामध्ये राहणाऱ्या एका महिलेचे अंघोळ करतानाचे बाथरूमच्या खिडकीतून सुरक्षा रक्षकाने फोटो काढल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याबाबत 26 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. फोटो काढणाऱ्या आयबीच्या सुरक्षारक्षकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. अशोक तुकाराम चव्हाण (वय 26 ) असे अटक केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की घटनेच्या दिवशी फिर्यादी महिला आयबीच्या गेस्ट हाऊसमधील आपल्या खोलीत दुपारी आंघोळ करीत होती. यावेळी गेस्ट हाऊसवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या अशोक चव्हाणने बाथरूमच्या खिडकी जवळ गेला. त्यानंतर त्याने फिर्यादीचे खिडकीतून अंघोळ करतानाचे फोटो काढले तसेच अंघोळ करतानाचा व्हिडिओही शूट केला.

मात्र बाथरूमच्या खिडकी बाहेर संबंधित महिलेला काही संशयास्पद हालचाली जाणवल्या, त्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच, त्यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने आजूबाजूचे लोक धावत आले व त्यांनी आरोपी अशोकला रंगेहात पकडले. लोकांनी त्याला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here