Crime | बायकोला मित्रासोबत अश्या अवस्थेत बघितले अन…विपरीत घडले

न्यूज डेस्क – आपल्या बायकोचे इतर पुरुषाबरोबर प्रेम संबध कोणताच नवरा सहन करणार नाही त्यात मित्रच जर पाठीत सुरा खुपसत असेल तर याचे खूप दुखः होते. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात घडली, येथे सहकारी मित्रानेच आपल्या पत्नीशी संबंध ठेवल्याचे दृश्य पतीने पाहताच डोक्यात नस तडकली व संतापाच्या भरात पतीने पत्नीचा खून केल्याची घटना गारबर्डी येथे गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रावेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत दोघा आरोपींना अटक केली आहे. या घटनेने रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, गारबर्डी येथे संशयीत आरोपी साधू मानसिंग बारेला (35) याच्याकडे त्याचा मित्र भायला भंगा बारेला (पिंपळखुटा, ता.जि.खंडवा, मध्यप्रदेश) हा गुरुवारी आपल्या मित्राच्या घरी आला घरी आल्यानंतर दारू आणण्यासाठी आरोपी साधू बारेला बाहेर पडला व याचवेळी संशयीत भायला बारेला याने साधू बारेलाच्या लहान मुलीला चॉकलेट आणण्यासाठीबाहेर पाठवले याचवेळी संशयीत भायला बारेला याने साधू बारेलाच्या लहान मुलीला चॉकलेट आणण्यासाठी 20 रुपये देत घराबाहेर पाठवले . याचवेळी आरोपी भायला बारेला याने आरोपी साधूची पत्नी सायजाबाई बारेला (30)याच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापीत केले .

काही वेळात दारू घेवून आरोपी साधू बारेला आला असता त्यांना मित्रासोबत आपल्या पत्नीला नको त्या अवस्थेत प्रणय क्रीडा करतांना दिसल्याने त्याने संतापाच्या भरात पत्नीला काठीने बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली तर यावेळी मित्र पसार झाला. हातावर – पायावर , बरगडीवर जबर मारहाण करण्यात आल्याने सायबा बाई बारेला यांचा मृत्यू ओढवला व ती जागीच ठार झाली.

या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून विवाहिता सायजाबाई बारेला यांच्या खून प्रकरणी मयताचे वडील चमार दलसिंग बरेला यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती साधू मानसिंग बारेला व त्याचा मित्र भायला भंगा बारेला ( पिंपळखुटा,जि.खंडवा, मध्यप्रदेश) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे , सहा.पोलीस निरीक्षक नाईक , पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख वाघमारे , हवालदार राजेंद्र राठोड , नाईक महेंद्र सुरवाडे , कॉन्स्टेबल सुरेश मेढे , प्रदीप सपकाळे , प्रमोद पाटील , विशाल पाटील , मंदार पाटील , पुरुषोत्तम पाटील , श्रीराम कांगणे , नरेंद्र बाविस्कर , संदीप धनगर , अतुल तडवी , सचिन घुगे , कुणाल पाटील करीत आहेत ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here