त्या युवकाच्या मुत्यूंस मी जबाबदार नाही डाँ.आर.पी चव्हाणांचा पत्रपरिषदेत खुलासा…

दर्यापूर – शहरातील वसंत नगर येथील पंकज अंबादास चव्हाण ( वय.२२) या युवकाचा अमरावती येथील खाजगी दवाखान्यात (दि.२) रात्री मूत्यूं झाला. या घटनेच्या दोन दिवसानंतर शुक्रवार (दि.५) मुतक पंकज च्या आईने दर्यापूर पोलीसात दिलेल्या लेखी तक्रांरीत माझ्या मुलाचा मुत्यूं शहरातील सिव्हिल लाईन येथील डाँक्टर आर.पी.चव्हाण यांच्या चुकीच्या उपचारामुळे झाला आहे.त्यामुळे डाँ.चव्हाण यांची चौकशी करुन त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी तक्रारीत केली आहे.

दरम्यान या प्रकरणी शनिवार (दि.६) सायंकाळी डाँ.आर.पी.चव्हाण यांनी स्वताच्या माई हाँस्पीटल मध्ये पत्रकार परिषद घेऊन मुतकाच्या आईने माझ्या विरोधात दिलेली तक्रार तथ्यहिन असून माझी वैद्यकीय क्षेत्रात व समाजात नाहक बदनामी होत आहे.

दि.२६ फेब्रुवारी रोजी पंकज दवाखान्यात आला असता मी प्राथमिक उपचार केले.त्यांनतर (दि.२८) ला रक्त तपासणी रिपोर्ट बघितल्यावर तातडीने अमरावती येथील पिडीएमसी अथवा खाजगी दवाखान्यात नेण्यास सांगितले होते.

दरम्यान अमरावती येथे न जाता पंकज (दि.२) रोजी दवाखान्यात आला व मला अशंक्तपणा वाटत आहे सलाईन लाव असे म्हटले त्यावर मि सलाईन,इजेक्शंन लावले पण सुधारणा न झाल्यामूळे अमरावती नेण्यास सांगितले व त्याच दिवशी त्याचा मत्यूं झाला. याप्रकरणी होणाऱ्या पुढील चौकशीस मि सामोरे जायला तयार असल्याचेही पत्रकार परिषदेत डाँ.आर.पी चव्हाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here