क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या ९० वा बलीदान दिन पुण्याच्या राजगुरूनगर येथील त्यांच्या जन्मवाड्यावर कोरोनाच्या पाश्वभुमीवर मर्यादित राजगुरुप्रेमींनी ध्वजारोहण करीत अभिवादन करुन सलामी देण्यात आली यावेळी खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण,स्मारक समिती अध्यक्ष अतुल देशमुख, पुरातन विभागाचे प्रमुख विलास वाहणे उपस्थीत होते
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्या राजगुरू यांना राजगुरुनगर येथील राजगुरुवाड्यावर आज बलीदान दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक देशप्रेमी येत असतात मात्र कोरोना महामारीचे संकट असल्याने राजगुरु प्रेमींनी राजगुरुवाड्यावर गर्दी करु नये असे
आवाहन हुतात्मा राजगुरु स्मारक समिती अध्यक्ष अतुल देशमुख यांनी केले. तसेच पुढील वर्षी हुतात्मा भगतसिंग ,राजगुरू आणि सुखदेव यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा तसेच शंभराच्या चलनी नोटेवर या तिघांना स्थान देण्यात यावे त्याच सोबत पुण्यातील विमानतळाचे “हुतात्म्या राजगुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी हुतात्मा राजगुरू मेमोरील ट्रस्ट चे अध्यक्ष विठ्ठल पाचारणे यांनी केली आहे.