पत्नीचा खून करणाऱ्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू…

नांदेड – महेंद्र गायकवाड

शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वामी विवेकानंद नगर येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील चौकीदाराने पत्नीचा खून केल्यानंतर विष प्राशन केले होते. त्या आरोपी पतीस पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी शासकीय रुग्णालया विष्णुपुरी येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने भाग्यनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शरहरातील स्वामी विवेकानंद नगर येथे वास्तव्यास असलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील चौकीदार वसंत माधवराव पोटजाळे वय (58)याने आपली पत्नी ज्योती वय (30) हिच्या चारित्र्यवर संशय घेऊन तिचा खून केल्याची घटना दि 24 सप्टेंबर रोजी सकाळी घडली होती.

आरोपींने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतः ही उंदीर मारण्याचे औषध सेवन केले व आपण पत्नीचा खून केल्याची कबुली दिली त्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असल्या 25 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here