राहुल मेस्त्री
पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना कागल तालुक्यातील एकोंडी गावातील घडलेली होती ती तब्बल एक वर्षाने आली उघडकीस. याबाबत अधिक माहिती अशी की मुळगाव येरगट्टी तालुका सौंदत्ती जिल्हा बेळगाव येथील गिरीश भिमाप्पा गिरेगोळ वय वर्ष 36 आणि आपली पत्नी सुषमा गिरीश गिरीगोळ वय वर्ष 31 यांच्यासह एक कुटुंब कागल तालुक्यातील एकोंडी गावातील जावेद बाबासाहेब मुलाणी यांच्या घरामध्ये घरगडी कामासाठी राहत होते.
अचानक गिरीश गिरगोळ आणि त्याची पत्नी सुषमा गिरगोळ या दोघामध्ये दि.26/1/2020 रोजी पहाटे चारच्या दरम्यान भांडण झाले असता पती गिरीश गिरगोळ याने आपल्या पत्नीचा दोरीने गळा आवळून जिव संपवला. आणि घर मालक मुलाणी यांना सांगितले की आपल्या पत्नीच्या छातीमध्ये दुखत आहे.
आणि ती बेशुद्ध अवस्थेत असून तिला दवाखान्यात दाखल करुया. आणि कागल पोलीस ठाण्यात खोटी फिर्याद दिली. व कागल प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये घेऊन आल्यानंतर सुषमा गिरगोळ या मृत अवस्थेत होत्या, गळ्यावर जुने जळलेले डाग असल्यामुळे डॉक्टरांना स्पष्ट मृत कशाने झाले आहेत. हे स्पष्ट करता आले नव्हते. व त्या ठिकाणी सदर व्यक्तीच्या शरीराचे शवविच्छेदन करून पती गिरीश गिरगोळ यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याने आपल्या मूळ गावी हा मृतदेह घेऊन जाऊन अंत्यविधी केला.
मात्र डॉक्टरांचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लवी पाटील यांनी मयत झालेल्या व्यक्तीचा गळा दाबून खून केल्याचा अंदाज व्यक्त केला. यानंतर दिनांक 12/1/2021 रोजी तात्काळ कागल पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेऊन आरोपी गिरीश गिरगोळ यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने गुन्हा कबूल केला.. सदर आरोपीवर आय पी सी कलम 302 201 182 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास कागल पोलिस करत आहेत.