भामोद येथे पत्नी आणि मुलीची हत्या करून पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या तालुक्यात एकच खळबळ…

दर्यापूर – किरण होले

दर्यापूर तालुक्यातील भामोद येथे पतीने आपल्या पत्नी व मुलीची हत्या करून स्वतः घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ज्या गावात साधी चोरी सुद्धा होत नाही त्या गावात दुहेरी हत्याकांड केलेल्या आत्महत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्नी व मुलीच्या मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने ही घटना उघडकीस आली.

अनिल दिनकरराव देशमुख वय 47 , असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. अनिल देशमुख त्यांची पत्नी वंदना अनिल देशमुख वय 45, व साक्षी अनिल देशमुख वय 17 असे हत्या केलेल्या पत्नी व मुलीचे नाव आहे. शुक्रवारी देशमुख यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी स्थानिक योद्धा पोलीस स्टेशन येथे माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता एका खोलीतील कपाटामध्ये पत्नीचा तर दिवाना खाली मुलीचा कुजलेल्या अवस्थेत तर दुसऱ्या खोलीत अनिलचा मृतदेह गळफास घेऊन आढळून आला. नागरिकांनी अनिल देशमुख याला गुरुवार रोजी रात्री गावात पाहिले होते. त्यामुळे त्याने आधी पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर रात्री आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मृतक अनिल यांच्याकडे लोडिंग वाहन होते परंतु मागील वर्षांपासून कोरोनामुळे ते देखील बंद होते. त्यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता. काही दिवसांपूर्वी त्याने गावातच राहणारी आई व वहिनी पुतण्या व पुतणी शी वाद घालत त्यांना मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांनी त्याच्याविरुद्ध एवढा पोलीस स्टेशन येथे तक्रार सुद्धा दाखल केली होती. व अनिल देशमुख यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले होते.

सदरचे घटनेमुळे गावात चांगलीच खळबळ उडाली आहे. सदरची घटनेचा पुढील तपास येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमुल बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.या घटने संदर्भात अद्याप पर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही.तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी दर्यापूर येथे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे.अमुल बच्छाव ठाणेदार येवदा

सुदैवाने लहान मुलगी बचावली
घटनेच्या आठ दिवसांपूर्वी मृत्यू अनिल ने लहान मुलगी रेणुका अनिल देशमुख १५ वय हिला मामाच्या गावाला नेऊन घातले होते.त्यामुळे ती बचावली परंतु आईची हत्या करून वडिलांनी आत्महत्या केल्याने तिच्या डोक्यावर मायची शस्त्र ठरवल्याने ती पोरकी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here