पतिनेच दिली पत्नीला जिवे मारण्याची सुपारी; कागल तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघड…

राहुल मेस्त्री

काल दि.18 रोजी पतिनेच पत्नीला जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार कागल तालुक्यातील गोरंबे येथील उघड झाला आहे. तर या प्रकरणाचा दोन महिन्यानंतर छडा लागला आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी कि गोरंबे ता.कागल येथील सागर शिरगावकर या व्यक्तीने आपली पत्नी गीता सागर शिरगावकर हिला जिवे मारण्याची सुपारी बेळगाव जिल्ह्यातील निपाणी शहरातील तीन अज्ञात तरुणांना दिली होती. व हे प्रकरण लपवण्यासाठी आरोपी सागर शिरगावकर याने स्वतः कागल पोलिस स्टेशन मध्ये आपली पत्नी बेपत्ता आहे. अशी फिर्याद दि.28 जुलै रोजी दिली होती.

याबाबत कागल पोलीस गेल्या दोन महिण्यापासून तपास करत होते .मात्र हाती काहीच निष्पन्न होत नव्हते.मात्र मयत गीता शिरगावकरच्या मोबाईलचे लोकेशन व काँल रेकाँर्ड तपासून सुपारी घेतलेल्या त्या तीन अज्ञात आरोपींना कागल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रितमकुमार पुजारी यांनी निपाणीतुन ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी सागर शिरगावकर यानेच गीता शिरगावकरला जिवे मारण्याची सुपारी दिल्याची कबुली त्या तीन आरोपींनी दिली.

सुपारी घेणाऱ्यांनी गीताच्या डोक्यात राँड मारून तिचा जिव 28 जुलै रोजीच संपवला व.. कुणालाही संशय येऊ नये म्हणून निपाणीतील जत्राट वेस नजीकच्या शेतात हा मृतदेह फेकून त्यावर किटकनाशक औषध मारले होते.

निपाणीतील बसवेश्वर पोलीस स्टेशन मधील पोलीसाच्या मदतीने कागल पोलीस घटना स्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूरला पाठविण्यात आला.तर या चारही आरोपींवर भारतीय दंड संहिता 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन कागल प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सदर आरोपींना 25 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.. अशी माहिती सदर तपास अधिकारी उपनिरीक्षक प्रितमकुमार पुजारी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here