पत्नीची हत्या करुन पतीची रेल्वेखाली आत्महत्या !…अनैतिक संबंध असल्याचा संशय…बोईसर-सरावलीतील घटना…

विनायक पवार – पालघर

संबंध असल्याच्या संशयातून पती पत्नीमधील वादाचे पर्यवसान भांडणात होवून पतीने पत्नीवर चाकूने वार करून ठार मारले. व नंतर स्वत: रेल्वे रूळावर जाऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच बोईसर-सरावली भागात घडली.

याबाबत माहिती अशी की, बोईसर-
सरावली येथे राहणारा महेन्द्र यादव ह्या व्यक्तिचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याची पत्नी माधुरी यादव यांच्यात रोज वाद होत होते. मंगळवारी दोघांमध्ये मोठे भांडण झाले, मात्र वेळीच मुलांनी शेजाऱ्यांना सांगितल्याने शेजाऱ्यानी वेळीच वाद मिटवला. त्यानंतर रात्री तीनच्या दरम्यान पुन्हा दोघांतील वाद झाला या वादातून महेन्द्र यादव याने पत्नीवर चाकूचे

वार करून जीवे ठार मारले. त्यानंतर स्वत: बोईसर रेल्वे रूळावर जाऊन धावत्या रेल्वे गाडीखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून अशा प्रकारच्या घटना सातत्याने होत असल्याने या भागांत गुन्हेगारीत वाढ होत असल्याने नागरीकांत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

दोन महिन्यापूर्वी पास्थळ येथे एका घरात पत्नीला मारून घर बंद करून पती पळून गेल्याची तर काही दिवसांपूर्वी वाणगांव

येथील एका फ्लॅटमधील भितीत प्रेयसीला जीवे मारून पुरवून ठेवल्याची घटना तर

गेल्या आठवड्यात पोलिसाला हाताशी धरून पत्नीने रिक्षाचालक पतिच्या खुनाची घटना ताजी असताना मंगळवारी पुन्हा पतीने पत्नीवर वार करून जीवे मारून स्वतः आत्महत्या केल्याच्या घटनेने कौटूंबिक गुन्हेगारीत वाढ होत असल्याने सामाजिकदृष्ट्या कायदा व सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here