खळबळजनक | पुरात अडकलेल्या पती-पत्नीचा मृत्यू…घरात पाणी शिरल्याने झाल्या गुदमरून मृत्यू…भंडारा येथील दुर्दैवी घटना…

भंडारा – प्रशांत देसाई

महापुरात घरात अडकून पडलेल्या पती-पतीचा पाण्यात सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारला) सकाळी पाणी ओसरल्यानंतर उघडकीस आली.
रुपचंद सदाशिव कांबळे (५०) आणि रत्नमाला रुपचंद्र कांबळे (४५) असे दुर्दैवी पती-पत्नीचे नाव आहे.

दाभा ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगरी वसाहत जवळ ही घटना घडली. नाल्यालगत या कांबळे दाम्पत्यांचं एकच घर आहे. या घराला पुराच्या पाण्याने पुर्णतः वेढले असताना बाहेर निघण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे पाण्यात गुदमरून पती-पत्नीचा मृत्यू झाला.

त्यांच्यासोबत दोन बकऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती रूपचंद याला प्रशासनाने पाण्याबाहेर काढल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, घरात अडकलेल्या पत्नी आणि बकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मृतक पुन्हा घरात गेल्याने तोपर्यंत पाण्याची पातळी धोक्याबाहेर गेल्याने त्यांना घराबाहेर निघता आले नाही.

त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतकांना चार मुली व एक मुलगा असल्याची माहिती मिळत आहे. मुलांना नातलागकडे पाठविल्याचे सुदैवाने ते बचावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here