पवनी जवळ जखमी वाघाने केला पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला…

जंगलात कार थांबविणे आले अंगलट…

सुदैवाने दोघेही वाघाच्या तावडीतून बचावले…

देवलापार – पुरूषोत्तम डडमल

पवनी पासून २ किमी.अंतरावर आज मंगळवार २५ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजताचे सुमारास पवनी-चोरबाहूली दरम्यान नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर लघुशंका करणेसाठी थांबलेल्या पती-पत्नीवर जखमी वाघाने प्राणघातक हल्ला केला,त्यात दोघेही जखमी झाले.मुलाने जमिनीवर लाकडी दांडा आपटल्याने वाघाने दोघांनाही सोडून पळ काढला. मिथलेश तिवारी(६३)व विमला तिवारी (५७ )नरसिंगपूर मध्य प्रदेश असे जखमींची नावे आहे.

ते नरसिंगपूर वरून नागपूरला त्यांच्या वाहन क्र.एमपी-सी ५२८७ ने उपचाराकरिता जात असल्याचे समजते. आज मंगळवारी सकाळी ९.३० वाजता पवनी गाव ओलांडल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला थांबलेल्या कारमध्ये चार जण प्रवास करीत होते. मिथलेश तिवारी(६३) आणि विमला. तिवारी(५७)हे लघुशंका करणेसाठी कार खाली उतरल्यावर जखमी वाघाने महिलेवर प्राणघातक हल्ला केला.

महिलेला वाचविणेसाठी गेलेल्या पती मिथिलेश यांचेवर सुद्धा वाघाने हल्ला करून दोघांनाही जखमी केले.सर्व प्रथम जखमींना ओरियंटलच्या कर्मचाऱ्यांनी मनसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.वाघाला आधीच कोणत्यातरी अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असतांना जखमी केले होते.

ही घटना कक्ष क्र.४२० च्या जवळ घडली.घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करून बंदोबस्त लावण्यात आला.नागपूर येथील वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जखमी वाघाला पिंजऱ्यात कैद करून उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले.महामार्गावर घडलेल्या घटनेमुळे येणाऱ्या -जाणाऱ्या हजारो बघ्यांची गर्दी वाघ बघणेसाठी जमली होती.

देवलापारचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.प्रादेशिक वनपरिमंडळाचे वन परिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे व एफडीसीएमचे वन परिक्षेत्र अधिकारी आर.जी.रंगारी व वनविभागाचे टीम यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here