आकोटातील विविध शासकिय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त…तर सार्व.बांधकाम विभागाचे जागतिक बँक प्रकल्प कार्यालयच गायब…

संजय आठवले, अकोट

आकोट तालुक्यातील तहसिल, नगर पालीकेसह विविध शासकिय कार्यालयांमध्ये कार्यालय प्रमुख ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या शेकडो जागा रिक्त असुन अंतर्गत तथा बहिर्गत प्रभारींच्या भरोशावर आकोट शहर व तालुक्याचा कारभार सुरु आहे. अतिशय धक्कादायक बाब म्हणजे सार्व, बांध. विभागाचे कार्यकारी अभियंता, जागतिक बँक प्रकल्प हे कार्यालयच आकोट ऊपविभागातून गायब झाले आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यानंतर सर्वात मोठा तालुका म्हणून आकोट तालुका ओळखला जातो. पर्वतिय भूप्रदेश आणि गौण खनिज खाणींमुळे महसुल मिळण्याचे दृष्टीनेही हा तालुका अतिशय महत्वपुर्ण मानला जातो.

त्यामूळे येथिल कारभार निट चालून शासकिय खजिन्यात योग्य तो भरणा चोख व्हावा सोबतच जनतेची कामे वेळच्या वेळेत व्हावीत यासाठी या मंजुर अधिकारी तथा कर्मचारी सेवारत असणे अतिशय गरजेचे आहे. परंतु आकोट पालीका, तहसिल तथा अन्य शासकिय कार्यालयांचा धांडोळा घेतला असता येथे कार्यालय प्रमुख ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या शेकडो जागा रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव ऊघड झाले आहे.

ऊपविभागिय अधिकारी [महसुल] यांचे कार्यालयात ना. तह.-१, शिपाई-१, अका-१, कारकुन-१, वाहन चालक-१ अशा पाच जागा रिक्त आहेत. तहसिलदार कार्यालयात निवासी व महसुल ना. तह.-२, तलाठी-४, कोतवाल-३०, महसुल सहा.-५, अका ईजिएस-१ अशा ४२ जागा रिक्त आहेत. पालीका कार्यालयात संवर्गाच्या २२ जागांसह, स्थापत्य अभियंता-५, नगर रचना-३, पाणीपुरवठा-१, कर व प्रशासकिय सेवा-९, अग्निशमन-३, आरोग्य निरिक्षक-२ अशा ४५ जागा रिक्त आहेत.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी-१, मंडळ कृषी अधिकारी-१, कृषी पर्यवेक्षक-२, कृषी सहा.-१०, अनुरेखक-५, सहा. अधिक्षक-१, लिपिक-२, शिपाई-४, चौकिदार-१ अशा २७ जागा रिक्त आहेत. ऊपविभागिय कृषी अधिकारी हे प्रभारी असुन तेल्हारा ता. कृषी अधिकारी हा कारभार सांभाळीत आहेत, तर कार्यालयात कृषी सह. -१, कृषी पर्यवेक्षक-२, तंत्र अधिक्षक-१, कृषी अधिकारी-१, क. लिपिक-१ व शिपाई-१ अशा ७ जागा रिक्त आहेत.

सहकारी संस्थाचे सहा. निबंधक यांचा प्रभार मुर्तिजापूर सहा. निबंधक यांचेकडे दिलेला आहे. या कार्यालयात सहा. निबंधक-१, सहकार अधिकारी-१, मुख्य लिपिक-१, लिपिक-२ तथा शिपाई-१ अशा ६जागा रिक्त आहेत. सार्व. बांध. विभाग कार्यालयात क. अभियंता -३, स्थापत्य अभियंता-३, वरिष्ठ लिपिक-१ व शिपाई-१ अशा ८ जागा रिक्त आहेत.

सार्व. बांध. विभागाद्वारे आकोट, तेल्हारा व खामगाव या ऊपविभागासाठी कार्यकारी अभियंता, जागतिक बँक प्रकल्प हे कार्यालय आकोट या मुख्यालयी स्थापन केलेले आहे. परंतु धक्कादायक बाब म्हणजे आकोट ऊपविभागातुन हे कार्यालयच गायब झाले आहे.शासकिय कार्यालयांतील तुटपूंज्या मॕन पाॕवरमुळे आकोट शहर व तालुक्यातील असंख्य कामे रेंगाळलेली आहेत. त्यामूळे नागरीक अगदी मेटाकुटीस आल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here