मेगा लसीकरण ड्राईव्ह ला प्रचंड प्रतिसाद…वोक्हार्ट हॉस्पिटल व रोटरी एलिट चा संयुक्त उपक्रम…

नागपूर – शरद नागदेवे

वोकहार्ट हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट च्या वतीने संयुक्त कोवॅक्सिन व कोविशील्ड लसीकरण चा मेगा कॅम्प आज साई सभागृह, शंकर नगर, नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता.

महापौर श्री दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते या लसीकरण मेगा कॅम्प चे उदघाटन करण्यात आले. धरमपेठ झोन चे सभापती श्री सुनील हिरंवार, नगरसेविका सौ प्रगती पाटील व महाराष्ट्र हिंदी राष्ट्रभाषा सभेचे अध्यक्ष श्री अजय पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण आयोजित केल्या बद्दल वोकहार्ट हॉस्पिटल च्या डॉक्टर्स ,. परिचारिका व रोटरी एलिट च्या संपूर्ण टीम चे कौतुक केले.

नागपूर महानगर पालिका भारताच्या ७५ वी स्वतंत्र दिवसा निमित्य शहरातील ७५ दवाखाने , म.ना पा. शाळेतील ७५ मुलांना संपूर्ण स्कॉलरशिप व त्यांचा IQ तपासून त्यांना पुढील अभ्यासक्रम ( IIT -JEE ) मेडिकल, डिफेन्स इत्यादी , बिहार चे श्री आनंद कुमार यांच्या सुपर ३० नी प्रेरित होऊन करण्याचा निर्धार केला आहे. , शहरात नागरिकांच्या स्वास्थासाठी ७५ ओक्ससीजन पार्क विकसित करण्यात येणार आहे.

वोकहार्ट हॉस्पिटल चे श्री अभिनंदन दासनेवर व रोटरी एलिट चे अध्यक्ष श्री शुभंकर पाटील ह्यांनी या पुढे सुद्धा नागपूरकरांच्या हितासाठी विविध आजारासाठी मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात येतील असे जाहीर केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वोकहार्ट तर्फे डॉ अनुजा नन्नावरे , डॉ राकेश शाह व रोटरी तर्फे श्री अक्षित खोसला , कशिश वाणी, करण जोत्वांनी ,सार्थक गुगनानी , भारत गुर्णानी, अनमोल साहनी, रोहन साहनी, श्रेय गुप्ता, नमन लढा यांनी प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here