सरकारच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात प्रचंड आक्रोश मोर्चा…

नागपूर – शरद नागदेवे

तिन पक्षमिळून बनलेल्या आघाडी सरकारने मागासवर्गियाःचे शैक्षणिक व सामाजिक आरक्षण संपविण्याचे षडयंत्र सुरु केले.दि.7/5/2021 रोजी पदोन्नतीतील आरक्षण संपविण्याचा निर्णय ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारयांच्या निर्देशानुसार मंत्री गट समिती सदस्यांना विश्वासात न घेता असंविधानिक पध्दतीने व बेकायदेशीर पणे रद्द केलेव मा.सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीत आरक्षण देण्याचे निर्णय असतांना,मागासवर्गियांच्या 34%पदोन्नतीच्या रिक्तपदावर खुल्या प्रवर्गातून पदोन्नती दिली.

त्याविरोधात 80सामाजिक संघटांनी एकत्रित येऊन आरक्षण हक्क कृतीसमितीगठित करण्यात आली या समितीद्वारा 20एप्रीलला राज्यभर आंदोलने केली.सरकारची दडपशाही,हुकुमशाही व मागासवर्गिय भूमिकेचा विरोध करण्यासाठी आज दि.26/6/2021 रोजी आरक्षणाचे जनक शाहु महाराजांना अभिवादन करुन राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आले,

नागपूर ये आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य निमंत्रक अरुण गाडे अध्यक्ष कास्ट्राईब महासंघ आणि नरेंद्र जारोंडे यांचे पूढाकाराने संविधान चौक नागपूरयेथे जन आंदोलन करण्यात आले,या जनआंदोलनात सर्व रिपब्लिकन गटाचे व ईतर आंबेडकरी राजकिय पक्षाचे प्रमुख नेते,विविध सामाजिक व कामगार संघटनांचे नेते सामिल झाले मोठ्या प्रमाणात ऊपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शन डाँ.सुखदेव थोरात सर व डाँ.प्रदीप आगलावे यांनी केले.

मोर्चाला प्रकाश गजभिये,भुपेश थुलकर,ऊपेद्र शेंडे,अनिल नगराळे,अशोकभाऊ सरस्वती,शिवदास वासे,अँड.स्मिता कांबळे,अँड.सोनिया गजभिये,मधुकर ऊईके,नामा जाधव ,छाया खोब्रागडे,तक्षशीला वाघधरे,रविभाऊ शेंडे,ऊत्तम शेवडे,बानाईचे विजय मेश्राम,कुलदीप रामटेके,राहुल परुळकर,नरेंद्र जांरोंडे व ईतर नेत्यांनी संबोधित केले.तर विशेस ऊपस्थितामधे आंबेडकरी विचार बचाव मोर्चाचे नारायण बागडे,रिपब्लीकन सेनेचे सागर डबरासे,

बंजारा समाजाचे नायक चव्हाण,धनगर संघटनेचे अनिल ढोले,गोंडाना गणतंत्र पार्टीचे पदाधिकारी व अनेक सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारीषऊफस्थित होते.बंजारा समाजाच्या महिलांनी पांरपांरिक वेषात सरकार मूर्दाबादच्या घोषनांनी परिसर दणाणून गेला.

मोर्चाबाबतची भूमिका अरुण गाडे अध्यक्ष कास्ट्राईब महासंघ यांनी विशद केली,संचालन पुरण मेश्राम,आभार सिताराम राठोड यांनी केले. पोलीसांनी मोर्चास परवानगी न दिल्यामुळे जवळपास 5 हजार ऊपस्थित आंदोलकांनी सरकारचा निषेध करुन तीव्र निदर्शने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here