Wednesday, May 31, 2023
HomeBreaking NewsHSC Result 2023 | १२ वीचा निकाल उद्या लागणार...येथे निकाल तपासा...

HSC Result 2023 | १२ वीचा निकाल उद्या लागणार…येथे निकाल तपासा…

HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे HSC Result 2023 बारावीचा निकाल उद्या लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही निकालाची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षांचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. मात्र आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे उद्या 25 तारखेला लागणार असल्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्र इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 12,57,293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणीकृत विद्यार्थ्यांमध्ये 7,92,780 पुरुष आणि 6,64,441 महिला आहेत.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 25 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. २५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांनी सायन्स, कॉमर्स, आर्ट तिन्ही विभागांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येईल. यासोबतच विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे.

येथे निकाल पाहू शकता…

Maharesult.nic.in

hsc.maharesult.org.in

hscresult.mkcl.org

तर मोबाईलवर SMS द्वारे असा पाहा निकाल….
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

१२वीचा निकाल २०२३ कसा तपासायचा
स्टेप 1: मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in ला भेट द्या.
स्टेप 2: मुख्यपृष्ठावर, महाराष्ट्र एचएससी 12वी निकाल 2023 साठी लिंकवर क्लिक करा (एकदा लिंक सक्रिय झाल्यानंतर).
स्टेप 3: स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ दिसेल.
स्टेप 4: आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 5: तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
स्टेप 6: डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: