कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना कसे भ्रमित करता येईल…हरियाणाच्या भाजपा कार्यकर्त्यांने बैठकीत विचारले

न्यूज डेस्क : हरियाणामध्ये गुरुग्राम मध्ये कृषी कायद्याच्या मुद्दय़ावर संवाद साधण्यासाठी बोलावलेल्या भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्याने जमीनीचे सत्य समोर आणले त्यामुळे भाजपाची चांगलीच गोची निर्माण झाली असून विरोधक या video वरून चांगलेच ट्रोल करीत आहे.

भाजपच्या बैठीकीत एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक भाजपा कार्यकर्ता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विचारत आहे, “कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी आपले म्हणणे ऐकण्यास तयार नाहीत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्याही युक्तिवादावर बोलू इच्छित नाहीत. कृषी कायदे विषयी त्यांना भ्रमित करावे लागेल. ” गुरुग्राम येथे झालेल्या या बैठकीत भाजपाचे हरियाणा युनिटचे प्रमुख ओपी धनखड़, क्रीडामंत्री संदीप सिंह आणि हिसारचे खासदार ब्रिजेंद्र सिंहही उपस्थित होते. कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सुरजेवाला यांनी ट्विट केले की, “भाजपचे कार्यकर्ते पक्ष नेते आणि मंत्र्यांची भेट घेत आहेत आणि त्यांना शेतकर्‍यांना कसे मूर्ख बनवायचे हे विचारत आहेत. ते त्यांचे म्हणणे मान्य करण्यास शेतकरी अजिबात तयार नाहीत, असे ते स्पष्टपणे सांगत आहेत. हाच भाजपचा खरा चेहरा आहे.

नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. हजारो शेतक्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या बैठकीनंतर हरियाणा, पश्चिम यूपीतील नेत्यांना शेतकरी नेत्यांनी, खाप चौधरींची भेट घेऊन कृषी कायद्याचे फायदे समजावून सांगण्यास सांगितले आहे. मात्र, शेतकरी नेत्यांना भेटण्यासाठी जाणारे भाजप नेते स्थानिक लोकांच्या नाराजीचा सामना करीत आहेत. हे तीनही कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकरी एमएसपीवरील कायदेशीर हमीपेक्षा कमी काहीही स्वीकारण्यास तयार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here