कोविडच्या कारणांमुळे ज्येष्ठ समाजसेवक रुपचंद्र ढाबरे यांच्या देहदानास मेयो-मेडीकल रुग्णालयाचा नकार…

नागपूर – शरद नागदेवे

न्यू कैलास नगर निवासी रुपचंद ढाबरे ह्यांचे वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धापकाळाने आज 28 फेब्रुवारी ला सकाळी निधन झाले.20 वर्षापूर्वी त्यांनी आपले शरीर शासकीय वैद्यकीय रुग्णालय नागपूर मधे देहदानाचा फार्म भरुन मेडीकल ला दान केले होते. त्यानुसार आज दुपारी 12 वाजता च्या दरम्यान ढाबरे परिवाराच्या वतीने मी स्वतः मेडीकल-मेयो च्या संबंधितांशी फोनद्वारे ती बॉडी दान करण्यासंदर्भात बोललो.

त्यावर डॉक्टरांनी 5 तास झाले, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे कोणत्याही खासगी डॉक्टर कडून मृत्यु चे प्रमाणपत्र पाहीजे, त्यातही त्यांचा मृत्यु हा नैसर्गिक झाल्याचेही त्यात नमूद असावे. त्याहीपुढे कोव्हीड ची चाचणी करुन त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यावरच त्याचा विचार केल्या जाईल. असे मेयो-मेडीकल च्या संबंधितांनी सांगीतले.

त्यावर आम्ही परिवारातील लोकं तुमच्या हॉस्पिटलमध्ये बॉडी घेऊन येतो, तुम्हीच कोरोना ची टेस्ट करा, कोविड नसेल तर बॉडी ठेऊन घ्या व कोव्हीड असेल तर बॉडी ची तुम्हीच विल्हेवाट लावा अशी सूचना केली.

ती सूचना अमान्य करुन हल्ली कोव्हीड चा काळ असल्याने आम्ही बॉडी दान घेऊ शकत नाही असेही त्यांनी सांगितले, त्यामूळे त्या बॉडीवर सायंकाळी 4 वाजता माणेवाडा घाटावर अग्नी संस्कार करण्यात आला.ढाबरे हे बसपा चे जुने कार्यकर्ते होते. त्यांचे मूळ गाव बुट्टीबोरी परिसरातील रिधोरा (सातगाव, वेनानगर) असून कामासाठी ते नागपुरात आले व घराचे ठेकेदार म्हणून स्थायिक झाले.

या कालावधीत त्यांनी सुरुवातीस बसपा ची विचारधारा पसरविण्याचे कार्य केले. त्यामुळे त्यांना या परिसरात बीएसपी वाले बाबाजी म्हणून त्यांची ओळख झाली होती. त्यांनी बहुजन चळवळीचे दैनिक बहुजन टाईम्स व साप्ताहिक बहुजन नायक घरोघरी वितरीत करण्याचे कार्य केले त्यामुळे स्वतः कांशीरामजी ह्यांनी ढाबरे ह्यांचे 14 आक्टो. 2002 ला प्रमानपत्र देऊन सन्मानित केले होते.

त्यांच्या मागे पत्नी सुलोचना, मुलगी सुरेखा, कांता, वर्षा व मुलगा अनुप असा परिवार आहे.आज सायंकाळी माणेवाडा घाटावर अग्नी संस्कार झाल्यावर बसपा नेते उत्तम शेवडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. त्यात प्रा डॉ रामाराव ढाबरे, दिलीप नानवटे, जीवन वाळके, शंकर थुल, काशीनाथ उमरे, विलास मून, प्रभाकर जवादे, नगरसेविका वंदना भगत, पाटील आदींनी शोक संवेदना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here