पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात…बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले

फोटो -सौजन्य ANI

न्युज डेस्क- पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये रेल्वे अपघात झाला आहे. बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. ट्रेनचे ४ ते ५ बोगी रुळावरून घसरले असल्याचे सांगण्यात येत आहे. मोयनागुरी ओलांडल्यानंतर ही घटना घडली. ही ट्रेन पटनाहून गुवाहाटीला जात होती. अलीपुरद्वारचे डीआरएम, एसपी आणि डीएम सर्व घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू झाले आहे.रेल्वेने बचाव हेल्पलाइन जारी केली.

रुळावरून घसरल्याने गुवाहाटीकडे जाणाऱ्या बिकानेर एक्स्प्रेसचे ४-५ डबे उत्तर बंगालमधील कूचबिहार आणि जलपाईगुडी दरम्यान डोमोहनीजवळ मायागोरी येथे उलटले. एकूण 12 डब्यांना अपघात झाला आहे.

अपघातातील मृतांचा आकडा अद्याप समजू शकलेला नसून, अपघाताची तीव्रता पाहता अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. उलटलेल्या डब्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी अडकले असून अनेक जखमी झाले आहेत.

ट्रेन क्रमांक १५६३३ बिकानेर एक्सप्रेस मंगळवारी रात्री राजस्थानमधील बिकानेर येथून निघाली होती. गुरुवारी पहाटे ५.४४ वाजता ही ट्रेन पाटणा रेल्वे स्थानकातून निघून दुपारी २ वाजता किशनगंजला पोहोचली आणि तेथून गुवाहाटीकडे रवाना झाली. भारतीय रेल्वेने 8134054999 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. अजूनही अनेक लोक ट्रेनमध्ये अडकले असून, त्यांचे बचावकार्य सुरू आहे.

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जखमींवर लवकरात लवकर उपचार करण्याच्या सूचना दिल्या असून बचाव कार्याचे आदेशही दिले आहेत.

गुवाहाटीच्या दिशेने जात होती ट्रेन
विशेष म्हणजे ही ट्रेन रात्री 12.30 पर्यंत गुवाहाटीला पोहोचणार होती, मात्र त्यापूर्वीच हा मोठा अपघात झाला. या अपघातात किती लोक जखमी झाले आहेत, याची आकडेवारी रेल्वेकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here